Breakup झाल्याने 8368 कोटींना विकली कंपनी; आता विचारतोय, 'या पैशांचं काय करु?' हा भारतीय जगभरात चर्चेत

Indian Man Sells Company For 8368 Crore: अचानक श्रीमंत झाल्यानंतर काय करावं कळणार नाही, असं म्हटलं जातं. या तरुणाबरोबर खरोखरच हे असं झालं आहे. हा भारतीय तरुण आहे तरी कोण आणि त्याचं काय म्हणणं आहे पाहूयात...  

| Jan 06, 2025, 13:30 PM IST
1/13

vinayhiremath

त्यानेच आता एक ब्लॉग लिहून एवढ्या पैशांचं काय करु असं विचारतानाच नेमकं आयुष्यात काय काय घडतंय याबद्दल सांगितलं आहे. हा तरुण कोण आहे आणि त्याने काय केलं आहे जाणून घ्या...

2/13

vinayhiremath

एखादी कंपनी तयार करुन ती यशस्वीपणे चालवण्यासाठी काही लोक आपलं संपूर्ण आयुष्य पणाला लावतात. आपल्या आयुष्यातील बहुतांश भाग हे लोक कंपनी उभारण्यासाठी आणि तिला यशाच्या शिखरावर नेण्यासाठी घालवतात.  

3/13

vinayhiremath

मात्र हल्ली असेही काही लोक सापडतात जे अगदी कमी वयात यशस्वी होतात आणि त्यांनी सुरु केलेल्या उद्योगाला प्रचंड प्रतिसाद मिळतो ज्यामुळे ते अल्पवधीत अब्जाधीश होतात. अशाच तरुणांपैकी एक म्हणजे विनय हिरेमथ!  

4/13

vinayhiremath

विनयने नुकतीच त्याची कंपनी विकली. मात्र या व्यवहारामागील कारण फारच रंजक आहे. आपल्या प्रेयसीबरोबर ब्रेकअप झाल्यानं विनयने कंपनी विकली.   

5/13

vinayhiremath

विशेष म्हणजे विनयने आपली कंपनी काही कोटींना नाही तर तब्बल 975 मिलियन अमेरिकी डॉलर्स म्हणजेच 8368 कोटी रुपयांना विकली आहे. सोशल मीडियावर आता विनयने या एवढ्या पैशांचं मी काय करु असं लोकांना विचारलं आहे.  

6/13

vinayhiremath

33 वर्षीय विनय हिरेमथ हा भारतीय वंशांचा उद्योजक असून तो अमेरिकेत वास्तव्यास आहे. विनय हा 'लूम' नावाच्या कंपनीचा सहसंस्थापक आहे. त्याने आपली ही स्टार्टअप कंपनी सन 2023 मध्ये 975 मिलियन डॉलर्सला विकती होती.   

7/13

vinayhiremath

विनयच्या कंपनीला एटलसियन या कंपनीने विकत घेतलं होतं. या व्यवहारामुळे रातोरात विनय अब्जाधीश झाला होता. आता विनयने एक लांबलचक ब्लॉग लिहिला आहे. या ब्लॉगमध्ये विनयने त्यांच्या आयुष्यात होत असलेल्या बदलांबद्दल भाष्य केलं आहे.  

8/13

vinayhiremath

"मी फार श्रीमंत झालो आहे. आता मी माझ्या आयुष्यात काय करु हे मला कळत नाहीये. मागील वर्ष माझ्यासाठी फारच खडतर होतं. मागील वर्षी मी कंपनी विकल्यानंतर आता स्वत:ला फार अवघडलेल्या अवस्थेत पाहतोय," असं विनयं म्हणाला.  

9/13

vinayhiremath

"मला आता आयुष्यभर कोणतंही काम करण्याची गरज नाहीये. मला प्रत्येक गोष्टीमध्ये नवीन्य जाणवतंय पण त्यात प्रेरणा घेण्यासारखं काही नाहीये. मी आताच एवढा पैसा कमवला आहे की या पैशांचं काय करायचं मला कळत नाहीये," अशी कबुली विनयने ब्लॉगमध्ये दिली आहे.  

10/13

vinayhiremath

विनयने आपल्या ब्लॉगमध्ये प्रेयसीबरोबरच्या ब्रेकअपबद्दलही लिहिलं आहे. "प्रेयसीबरोबरीच दोन वर्ष फार छान गेली. मात्र असुरक्षित वाटत असल्याने आमचं ब्रेकअप झालं. हे फारच दु:खद होतं. मात्र निर्णय घेणं योग्यच होतं," असं विनय म्हणाला आहे.  

11/13

vinayhiremath

या ब्लॉगमध्ये विनयने आपल्या प्रेयसीची माफीही मागितली आहे. "प्रत्येक गोष्टीसाठी मी तुझा आभारी आहे. मला वाईट वाटतंय की तुला जसा मी अपेक्षित होतो तसं मला होता आलं नाही," असं विनयने म्हटलं आहे.   

12/13

vinayhiremath

विनयच्या 'लूम' कंपनीला विकत घेणाऱ्या कंपनीने त्याला सीटीओ म्हणजेच मुख्य तांत्रिक अधिकारी होण्यासाठी 60 मिलियन डॉलर्सच्या पॅकेजसहीत जॉब ऑफर केला होता.  

13/13

vinayhiremath

"मात्र आपण समोर आलेल्या या जॉब ऑफरवर कोणताही निर्णय घेतला नाही" असं विनय म्हणाला आहे. आपल्याला एलन मस्कप्रमाणे व्हायचं आहे, असं त्याने ब्लॉगमध्ये म्हटलंय.