सीबीएसईच्या १० आणि १२ वीच्या परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय
सीबीएसईच्या १० आणि १२ वीच्या परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पेपरफुटी प्रकरणामुळे हा निर्णय घेण्यात आला. सीबीएसई बोर्डाच्या १० वीची गणिताची आणि १२ वी इयत्तेची अर्थशास्त्राची परीक्षा पुन्हा घेतली जाणार आहे. मात्र या परीक्षा कधी होणार त्याच्या तारखा अद्याप निश्चित केल्या नाहीत.
नवी दिल्ली : सीबीएसईच्या १० आणि १२ वीच्या परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पेपरफुटी प्रकरणामुळे हा निर्णय घेण्यात आला. सीबीएसई बोर्डाच्या १० वीची गणिताची आणि १२ वी इयत्तेची अर्थशास्त्राची परीक्षा पुन्हा घेतली जाणार आहे. मात्र या परीक्षा कधी होणार त्याच्या तारखा अद्याप निश्चित केल्या नाहीत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही सीबीएससी पेपरफुटी प्रकरणाची गंभीर दखल घेतली. याबाबत मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे मोदींनी नाराजी व्यक्त केली आणि याप्रकरणात कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सूत्राकडून मिळतेय.