मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या १२वीचा निकाल उद्या म्हणजेच ३० मेला जाहीर होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्या दुपारी एक वाजल्यानंतर विद्यार्थी ऑनलाईन निकाल पाहू शकणार आहेत. मंडळाकडून आज ही घोषणा करण्यात आली. 


गेल्या काही दिवसांपासून बारावीच्या निकालबाबातचे मेसेजेस व्हॉट्सअॅप, फेसबुकसारख्या सोशल मीडियावर फिरत होते. त्यामुळे विद्यार्थी, पालक संभ्रमात पडले होते. अखेर आज मंडळाकडून निकालाची तारीख जाहीर करण्यात आलीये. 


उद्या दुपारी एक वाजल्यापासून मंडळाच्या वेबसाईटवर निकाल पाहता येतील
www.mahresult.nic.in
www.msbshse.ac.in
www.mh-hsc.ac.in
www.hscresult.mkcl.org आणि
www.rediff.com/exam या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल.


दरवर्षीप्रमाणे यंदाही फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीची परीक्षा घेतली. राज्यातील ९ विभागीय मंडाळांतून ही परीक्षा घेण्यात आली. १५ लाख ५ हजार ३६५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.