जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टची रँकिंग जाहीर, भारताचा नंबर कितवा? जाणून घ्या

हेनले आणि पार्टनर्स ने सर्वात शक्तिशाली पासपोर्टची क्रमवारी जाहीर केली आहे. ही क्रमवारी 2025 च्या पहिल्या सहामाहीसाठी आहे. या क्रमवारीत कोणता देश कोणत्या जागी आहे हे जाणून घेऊयात. 

| Jan 09, 2025, 11:22 AM IST

The World’s most powerful passports for 2025: हेनले आणि पार्टनर्स ने सर्वात शक्तिशाली पासपोर्टची क्रमवारी जाहीर केली आहे. ही क्रमवारी 2025 च्या पहिल्या सहामाहीसाठी आहे. या क्रमवारीत कोणता देश कोणत्या जागी आहे हे जाणून घेऊयात. 

1/7

Henley Index 2025 India Rank

Henley Index 2025 India Rank: जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टची क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. हेनले आणि पार्टनर्स ही प्रतिष्ठित संस्था दरवर्षी ही क्रमवारी जाहीर करते. एक शक्तिशाली पासपोर्ट म्हणजे देशाचा पासपोर्ट जितका अधिक शक्तिशाली असेल तितका अधिक त्या देशातील लोक  व्हिसा मुक्त प्रवास करू शकटात. 

2/7

कोणता देश अव्वल स्थानी?

2025 च्या पहिल्या सहामाहीत शक्तिशाली पासपोर्टच्या यादीत सिंगापूर अव्वल आहे. या रँकिंगच्या आधारे सिंगापूरचा पासपोर्ट जगातील सर्वात शक्तिशाली असल्याने हा पासपोर्ट असलेल्या व्यक्तीला जगातील १९५ देशांमध्ये व्हिसा मोफत प्रवास करता येणार आहे.

3/7

दुसऱ्या नंबरवर कोण?

जगातील दुसरा सर्वात शक्तिशाली पासपोर्ट जपानचा आहे. जपानी पासपोर्टधारक 193 देशांमध्ये व्हिसा मोफत प्रवास करू शकतील. यानंतर दक्षिण कोरिया, फ्रान्स, जर्मनी, इटली, स्पेन आणि फिनलंड संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहेत. हे पासपोर्ट असणाऱ्यांना 192 देशांमध्ये व्हिसा फ्री एंट्री मिळू शकेल.

4/7

प्रसिद्ध कॅनडा कितच्या क्रमांकावर आहे?

सध्या कॅनडा आपल्या व्हिसा धोरणांमुळे जगभरात चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे. पासपोर्ट रँकिंगमध्ये कॅनडा, माल्टा आणि पोलंडसह ते 7 व्या क्रमांकावर आहे. तर ऑस्ट्रिया, डेन्मार्क, आयर्लंड, लक्झेंबर्ग, नॉर्वे, स्वीडन, नेदरलँड, बेल्जियम, पोर्तुगाल, न्यूझीलंड, स्वित्झर्लंड आणि ब्रिटन इ.  

5/7

भारताचा नंबर कितवा?

भारताचा पासपोर्ट जगात 85 व्या क्रमांकावर आहे. अशा प्रकारे भारतीय पासपोर्टवर जगातील ५७ देशांमध्ये व्हिसा फ्री प्रवास करता येणार आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत भारताच्या पासपोर्टच्या क्रमवारीत 5 अंकांची घसरण झाली आहे.

6/7

सर्वात कमकुवत पासपोर्ट पाकिस्तानचा

जर आपण भारताच्या शेजारी देश पाकिस्तानबद्दल बोलायचे झाले तर, जगातील सर्वात गरीब देशांपैकी एक असलेल्या सोमालियाच्या पासपोर्टपेक्षाही क्रमवारीत पाकिस्तानचा क्रमांक कमी आहे. हेन्ले इंडेक्स पासपोर्ट रँकिंगमध्ये पाकिस्तानचा पासपोर्ट 103 व्या क्रमांकावर आहे. तर सोमालिया 102 व्या क्रमांकावर आहे.

7/7

सगळ्यात खालच्या नंबर कोण?

पाकिस्तानी पासपोर्टच्या खाली असलेल्या क्रमांकांबद्दल बोलायचे तर त्यात इराक (104 वा), सीरिया (105 वा) आणि अफगाणिस्तान (106 वा) यांचा समावेश आहे. म्हणजे युद्धात धुमाकूळ घालणाऱ्या या देशांचे पासपोर्ट पाकिस्तानच्या तुलनेत कमकुवत आहेत.