मुंबई : राज्यातील उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल लागला. या निकालात कोकण विभागाने अव्वल क्रमांक पटकावला तर मुंलींनी पुन्हा एकदा बाजी मारली. मात्र, ज्यांना कमी मार्क पडले असतील त्यांना गुण पडताळणी करता येणार आहे. निकालाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच उद्यापासून विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी अर्ज करता येणार आहे. दरम्यान, बारावीच्या नापास विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये होणार आहे. याचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. आपल्या निकालाची प्रत संकेतस्थळावरुन काढून ( गुणपत्रिकेसाची प्रत) उत्तरपत्रिकेच्या छायप्रतीसाठी अर्ज काढता येईल. याबाबत अधिक माहिती हवी असल्यास विभागीय शिक्षण मंडळाशी संपर्क साधावा, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.


 ३१ मे ते ९ जूनपर्यंत शुल्क भरुन अर्ज करा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विद्यार्थ्यांनी गुण पडताळणीसाठी वेबसाईटवरील गुणपत्रिकेच्या स्वसाक्षांकित प्रतीसह ३१ मे ते ९ जूनपर्यंत शुल्क भरुन अर्ज करु शकता. तसेच उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी ३१ मे ते १९ जूनपर्यंत शुल्क भरुन अर्ज करता येणार आहे. उत्तरपत्रिकेच्या पुनर्मुल्यांकनासाठी आधी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे बंधनकारक आहे. छायाप्रत मिळाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून त्यापुढील पाच दिवसांत कार्यालयीन वेळेत पुनर्मुल्यांकनाचा अर्ज विभागीय शिक्षण मंडळाकडे करायचा आहे.


बारावीच्या नापास विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा


तसेच सर्व विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आपली श्रेणी सुधारण्यासाठी पुन्हा परीक्षेला बसता येऊ शकते. या विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्ट २०१८ किंवा फेब्रुवारी-मार्च २०१९ अशा दोन संधी श्रेणी सुधार योजनेंतर्गत मिळणार आहे. बारावीच्या नापास विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये होणार आहे. याचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.