नवी दिल्ली : सैन्य दलात भरतीची इच्छा असणाऱ्या तरूणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, भारतीय सैन्य दलात रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय सैन्य दलात ९० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सैन्य दलातील तांत्रिक पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.


इच्छुक उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज दाखल करु शकतात. या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांची देशातील विविध राज्यांमध्ये नियुक्ती करण्यात येणार आहे.


अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ नोव्हेंबर २०१७ आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज दाखल करु शकतात.


शैक्षणिक अट:


इच्छुक उमेदवार हा मान्यता प्राप्त विद्यापीठातून ७० टक्के मार्क्ससह फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स विषयात १२वी पास असावा. कुठल्याही बोर्डातून १२वी पास झालेला उमेदवारही या पदासाठी अर्ज दाखल करु शकतो. 


वयोमर्यादा:


भारतीय सैन्य दलात भरती होण्यासाठी इच्छुक उमेदवाराचं कमीत कमी वय १६ वर्ष ६ महिने आणि जास्तित जास्त १९ वर्ष ६ महिने असावं.


भरती प्रक्रिया:


या भरती प्रक्रियेसंदर्भातील माहिती इच्छुक उमेदवारांना joinindianarmy.nic.in या वेबसाईटवर मिळेल. या वेबसाईटवरुन तुम्ही ऑनलाईन अर्ज दाखल करु शकता.


निवड प्रक्रिया:


उमेदवारांची निवड त्यांना १२वीच्या परीक्षेत मिळालेले मार्क्स आणि मुलाखतीच्या आधारे करण्यात येणार आहे. दोन टप्प्यांमध्ये उमेदवारांची निवड करण्यात येईल.