मुंबई  : कोरोना विषाणूचा फैलाव वाढत आहे. कोरोनाचा उद्रेक लक्षात घेता राज्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या विविध विषयांसाठीच्या सामायिक प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी मुंबईत ही माहिती दिली. या परीक्षा पुढे ढकलण्याची अनेक विद्यार्थी आणि पालकांची मागणी लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. नवे वेळापत्रक योग्य वेळी जाहीर करू असही सामंत यांनी सांगितले आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंत्री उदय सामंत यांनी सांगितले, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाच्या विविध विषयांच्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (CET- सेल) माध्यमातून दरवर्षी उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाच्या विविध विषयांच्या प्रवेश परीक्षा घेण्यात येतात. सध्या संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात कोविड- १९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.


विद्यार्थी आणि पालकांकडून या प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याविषयी सातत्याने मागणी होत होती. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून या सर्व परीक्षांच्या तारखा नव्याने जाहीर करण्यात येतील, असेही सामंत यांनी संगितले.