नवी दिल्ली :  नीट आणि जेईई परीक्षांबाबत काँग्रेस आक्रमक झाले आहे. या परीक्षा घेऊ नका, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांनी परीक्षा घ्या अशी मागणी केली आहे, असे केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी म्हटले आहे. पोखरियाल यांनी विद्यार्थी परीक्षा घेण्यासाठी आग्रही असल्याचे म्हटले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोविड-१९चा प्रादुर्भाव होत आहे. कोरोना व्हायरसचे रुग्ण सापडत आहेत. कोविड- साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर जेईई, नीट च्या परीक्षा पुढे ढकलण्यासाठी  आवाहन करण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्र सरकारही या परीक्षा पुढे ढकरण्याची मागणी करत आहे. मात्र, या परीक्षा घेण्याबाबत आग्रही होत आहे. त्यामुळे कोरोनाच्या साथीच्या आजारामुळे पुढ ढकरण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे. दररम्यान, केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी विद्यार्थी परीक्षा घेण्यासाठी आग्रही असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता न्यायालय काय निर्णय देणार याकडे लक्ष लागले आहे.


दरम्यान, जेईई आणि नीट परीक्षेविरोधात काँग्रेस आक्रमक झालीय. परीक्षा पुढे ढकलण्यासाठी काँग्रेसनं उद्या राज्यव्यापी आंदोलन पुकारलंय. परीक्षांपेक्षा विद्यार्थ्यांचे आरोग्य महत्त्वाचं आहे. त्यामुळे केंद्र सरकारनं सप्टेंबरमध्ये परीक्षा घेण्याचा हट्ट सोडावा अशी मागणी काँग्रेसने केली आहे.