नवी दिल्ली : तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल. त्यातही भारतीय संसदेत नोकरी करण्याची इच्छा असेल तर, तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. संसद प्रशासनातील रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. त्याबाबतची जाहिरातही प्रसिद्ध झाली आहे. जाहिरातीतील नियम आणि अटींची तुमच्याकडून पुर्तता होत असेल तर, त्वरीत अर्ज करा. जाणून घ्या सविस्तर...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय संसदेमध्ये ट्रान्सलेटर पदासाठी अर्ज मागविण्या आले आहेत. आलेल्या अर्जातून निवड प्रक्रियेद्वारा ही भरती केली जाईल. ही भरती एकूण ३१ जागांसाठी असेल.


शौक्षणिक योग्यता:


संसदेत ट्रान्सलेटर पदासाठी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवाराकडे हिंदी विषयातील मास्टर पदवी असावी. (एम.ए)
तसेच, त्याने पदवी पर्यंत इंग्रजी शिक्षणही घेतलेले असावे.


निवड प्रक्रीया:


संसदेतील ट्रान्सलेटर पदासाठी उमेदवाराची निवड ही लिखीत परीक्षेवर अधारीत राहील. ही परीक्षा दोन टप्प्यांत घेतली जाईल.


वेतन (पगार)


या पदासाठी ९३०० ते ३४८०० रूपये प्रतिमहीना वेतन असेन. सोबतच ४८०० रूपयांचा ग्रेड पे सुद्धा मिळेन.


कसा कराल अर्ज


या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांना आवश्यक कागदपत्रांसह पूढील पत्त्यावर अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्यासाठी पत्ता: संयुक्त भरती सेल, लोकसभा सचिवालय रूम नंबर- ५२१, पार्लमेंट हाऊस एनेक्स, नवी दिल्ली.


अंतीम तारखी


या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार १४ ऑगस्ट पर्यंतची मुदत निर्धारीत करण्यात आली आहे.


या भरतीसाठी अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.