मुंबई : बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार घालण्याचा इशारा प्राध्यापकांनी दिलाय. मुंबई कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटना अर्थात 'मुक्टू'नं हा इशारा दिलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारनं प्राध्यापकांच्या विविध मागण्या पूर्ण केल्या नसल्यानं हा बहिष्कार घालण्यात येणार आहे. त्यासंदर्भातलं पत्र 'महाराष्ट्र राज्य बोर्डा'ला लिहिण्यात आलंय. 


५ फेब्रुवारीपासून बारावीची तोंडी परीक्षा सुरू होतेय. त्यावर बहिष्काराचा इशारा देण्यात आलाय.


तसंच कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी २ फेब्रुवारीला संपाची हाक दिलीय. त्याचबरोबर जेलभरो आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय.


७२ हजार प्राध्यापक यादिवशी संपावर जाणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नात हस्तक्षेप करून तोडगा काढावा, अशी मागणी 'मुक्टू'चे सरचीटणीस अनिल देशमुख यांनी केलीय.