नवी दिल्ली : शासकीय नोकरी शोधात असलेल्या तरुणांसाठी चांगली सुवर्ण संधी चालून आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने अनेक पदांसाठी बंपर भरती सुरु केली आहे. केवळ पदवीधर उमेदवार या पोस्टसाठी अर्ज करु शकतात. अर्ज प्रक्रिया गेल्या महिन्यापासून सुरु आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ९ ऑगस्ट आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिझर्व्ह बँकेत कायदेशीर अधिकारी, व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक आणि अन्य पदे रिक्त आहेत. प्रत्येक पोस्टसाठी विविध शैक्षणिक पात्रता निश्चित केल्या गेल्या आहेत. आपण आरबीआयमध्ये सरकारी नोकरी शोधत असाल तर खाली दिलेल्या माहितीनुसार अर्ज करावेत.


पोस्टची नावे


व्यवस्थापक तांत्रिक सिव्हिल - ५ जागा
सहाय्यक व्यवस्थापक (राज्यभाषा) - ८ जागा
लीगल अधिकारी ग्रेड बी - ९ जागा
सहाय्यक व्यवस्थापक (प्रोटोकॉल आणि सुरक्षा) - ४ जागा
एकून रिक्त पदांची संख्या : ३० जागा


शैक्षणिक पात्रता 


या जागांसाठी पदवीसह एलएलबी, बी.ई. आणि बी. टेक झालेले नोकरीसाठी अर्ज करु शकतात.  प्रत्येक रिक्त जागेसाठी विविध शैक्षणिक पात्रता निश्चित केल्या गेल्या आहेत.


या आधारावर निवड होईल


उमेदवारांची निवड लेखी परीक्षेच्या आधारावर होईल. यानंतर निवडलेल्या विद्यार्थ्यांची मुलाखत होईल. त्यांच्या प्रदर्शनानंतर त्या आधारावरच त्यांना नोकरी ऑफर मिळे.


किती मिळेल पगार


उमेदवारांना त्यांच्या पदांच्या पात्रतेनुसार वेतन मिळेल. रिझर्व्ह बँकेच्या ऑफिशिअल वेबसाईट rbi.org.in वर अधिक माहिती दिलेली आहे.