या कारणांमुळे आपल्या पार्टनरसोबत पासवर्ड शेअर करु नका!
प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती असते ज्यासोबत आपण सगळ्या लहान-सहान गोष्टी शेअर करतो.
नवी दिल्ली : प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती असते ज्यासोबत आपण सगळ्या लहान-सहान गोष्टी शेअर करतो. पण तरी देखील तुमची पर्सनल स्पेस असतेच. डिजिटल जगात अधिकतर लोक लॅपटॉप आणि आपल्या फोनमध्ये कैद झाले आहेत. अनेक महत्त्वाच्या गोष्टी त्यात असतात. त्यामुळे त्याचा पासवर्ड शेअर करणे धोकादायक ठरु शकते. पण काही वेळेस अनेक कारणास्तव आपला पासवर्ड पार्टनरसोबत शेअर केला जातो. त्यामुळे अनेक नाहक गोष्टींना सामोरे जावे लागू शकते. तुमची पर्सनल स्पेस संपते आणि नात्यात वाद निर्माण होऊ लागतात.
या कारणांमुळे शेअर केला जातो पासवर्ड
पासवर्ड शेअर करण्याची अनेक कारणे असू शकतात. काही वेळेस महत्त्वाच्या कामासंदर्भात पासवर्ड शेअर केला जातो. तर अनेकदा इमोशनल ब्लेकमेलिंग केल्यामुळे अनेकजण हा निर्णय घेतात. तर काहीजण पार्टनरवर पासवर्ड शेअर करण्यासाठी दबाव टाकतात. मग एकदा का पासवर्ड शेअर झाला की मोबाईल, लॅपटॉप आणि सोशल मीडिया अकाऊंट्सची चेकींग सुरू होते.त्यामुळे पार्टनरने पासवर्डची मागणी करताच आपल्या पर्सनल स्पेसची जाणीव त्याला/तिला करुन द्या. त्याचबरोबर तुमची सोशल मीडियासंबंधित कामे स्वतः करत जा. त्यामुळे तुम्हाला पासवर्ड शेअर करावा लागणार नाही.
पासवर्ड शेअर न करणे कसे टाळावे?
आपण दुसरं कोणासोबत पासवर्ड शेअर करणार नाही. पण आपल्या पार्टनरसोबत पासवर्ड शेअर न करणे कसे टाळावे? हा प्रश्न अनेकांना पडतो. पण याचा सोपा उपाय म्हणजे तुम्हीही तुमच्या पार्टनरकडे पासवर्डची मागणी करु नका. त्याला/तिलाही त्यांची पर्सनल स्पेस द्या. त्याचा आदर करा. आणि दुसरा उपाय म्हणजे सोशल मीडियासंबंधित तुमची कामे स्वतः करा.
पासवर्ड शेअर केल्याने नातेसंबंध बिघडतात
पासवर्ड शेअर झाल्याने तुमच्या पर्सनल स्पेसमध्ये कळत-नकळत दखल दिली जाते. मग एकमेकांचे मेसेजेस वाचणे, कमेंट्स करणे आणि सोशल मीडिया हॅंडल करणे सुरू होते. अशाने तुमची पर्सनल स्पेस कमी होते. हे सर्व टाळायचे असल्यास पासवर्ड सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे.