मुंबई : बँकिंगमध्ये तुम्हाला तुमचं करिअर करायचं असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे, देशातील सरकारी बँक आयडीबीआय बँकेने केडर अधिकारीपदी नियुक्ती करण्याचं ठरवलं आहे. असे एकूण 61 अधिकारी नियुक्त केले जाणार आहेत. बँकेने Specialist Cadre Officersच्या 61 पदासाठी इच्छुक कँडिडेट्सकडून अर्ज मागितले आहेत. ऑफिशियल वेबसाइट www.idbibank.in वर जावून अधिक माहिती मिळेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

IDBI Bank मध्ये केडर अधिकारी (विशेष तज्ञ) या पोस्टसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर आहे.  या पदांसाठी उमेदवार निवडीची प्रक्रिया (Group Discussions) आणि मुलाखत (Personal Interview)या आधारावर होणार आहे.


या पदांसाठीही अर्ज करा
आईडीबीआई बँकेत कृषि अधिकारी (Agriculture Officer)च्या 40 पोस्ट, व्यवहार विज्ञान (Faculty Behavioural Sciences) साठी 1 पोस्ट, अपहार जोखिम आधी नंतर व्यवस्थापनसाठी 14 पदं, फ्रॉड रिस्क मॅनेजमेंटसाठी 5 पदं तसेच ट्रान्झॅक्शन मॉनिटरिंग टीमसाठी 1 पोस्ट आहे.


योग्यता, वयोमर्यादा आणि अर्जाची फी
IDBI Bank ने या पदांसाठी 25 ते 45 वर्षाची वयोमर्य़ादा ठेवली आहे. मुलाखत 100 गुणांची असेल. यापदासाठी परीक्षा फी ही 700 रूपये असणार आहे. आरक्षणात येणाऱ्या उमेदवारांसाठी 150 रूपये फी असेल.