नवी दिल्ली : देशातील १००० गुणवंत विद्यार्थ्यांना ७५ हजार रुपये महिना स्कॉलरशीप दिली जाईल, अशी घोषणा केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'पंतप्रधान शिष्यवृत्ती' योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना ही आर्थिक सुविधा दिली जाणार आहे. देशातील शैक्षणिक मानक सुधारण्यासाठी सरकार २० हजार करोड रुपये खर्च करणार असल्याची माहितीही जावडेकर यांनी दिलीय. 


२० वर्ल्ड क्लास युनिव्हर्सिटी स्थापित करण्याचा सरकारचा मानस आहे... या युनिव्हर्सिटी जगातील टॉप २०० युनिव्हर्सिटीमध्ये आपली जागा बनवतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.