लखनऊ : उत्तर प्रदेशातल्या बनारस हिंदू विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांवर लाठीमार प्रकरणी, बनारसचे तीन अतिरिक्त दंडाधिकारी आणि दोघा पोलीस अधिका-यांना निलंबित करण्यात आलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या लाठीमार प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आलेत. या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी बोलून, ह्या प्रकरण दोषींवर तातडीनं कारवाई करण्याचे आदेश दिलेत. 


तर लाठीमार प्रकरणी पंतप्रधानांनी माफी मागावी अशी मागणी, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलीय. त्याचवेळी या लाठीमाराचा निषेध म्हणून, समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठाबाहेर जोरदार निदर्शनं केलं. तर एन एस यू आय तसंच ए बी वी पी नंही या लाठीमाराचा निषेध करत आंदोलन केलं.  


दरम्यान विदापीठाचे सुरक्षारक्षक आणि उत्तर प्रदेश पोलिसांचा गणवेश मिळताजुळता असल्यानं, अधिक गोंधळ टाळण्यासाठी सुरक्षारक्षकांचा गणवेश तातडीनं बदलण्यात यावा असे आदेश, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी विद्यापीठ कुलगुरुंना दिला आहे.