धोक्याचा इशारा: सोन्यात गुंतवणूक करताय? सावधान....
सोनं हा अनेक भारतीयांच्या बचतीच्या दृष्टीने महत्त्वाचा घटक. अनेक लोक हे बचतीसाठी सोन्यात गुंतवणूक करण्यालाच प्राधान्य देतात. पण, तुम्हीही सोन्यात गुंतवणूक करू पाहात असाल तर, वेळीच सावधान...
मुंबई : सोनं हा अनेक भारतीयांच्या बचतीच्या दृष्टीने महत्त्वाचा घटक. अनेक लोक हे बचतीसाठी सोन्यात गुंतवणूक करण्यालाच प्राधान्य देतात. पण, तुम्हीही सोन्यात गुंतवणूक करू पाहात असाल तर, वेळीच सावधान...
जगभरात सोन्याचा साठा मर्यादीत
अनेक तज्ज्ञांच्या मते सोन्यात गुंतवणूक करणे हे फारसे हिताचे नाही. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीपैकी एक आणि मोठा गुंतवणूकदार म्हणून ओळखले जाणारे वॉरेन बफेट हेसुद्धा अशा तज्ज्ञांपैकीच एक. बॉरेन बफेट म्हणतात, आज घडीला जगभरात १,७०,००० मेट्रीक टन इतक्या सोन्याच्या खाणी आहेत. जर सर्व खाणी आणि उपलब्ध सोने एकत्र केले तर, सर्व साईट्स या ६८-६९ फुट इतक्या असतील. बफेंनी ही गोष्ट जेव्हा सांगितली तेव्हा, सोन्याची प्रती ग्रॅम किंमत ही १,७५० डॉलर इतकी होती. त्यानुसार सर्व सोन्याची किंमत जर केली तर, ती संपूर्ण किंमत ही ९.६ ट्रिलियन डॉलर होते. आता सोन्याच्या या ढिगाला आपण 'क्ष' असे नाव देऊ.
जमीनीत करा गुंतवणूक....
जर आपण ९.६ ट्रिलियन डॉलर रूपयांच्या ढीग लावला. त्याला आपण 'ज्ञ' असे नाव देऊ. या पैशांतून जर आपण अमेरिकेत शेतीयोग्य ४०० मिलियन एकर जमीन खरेदी केली. जी प्रतिवर्ष २०० बिलीयन डॉलर कमाऊन देऊ शकते.
जमीन प्रतिवर्ष फायदा देते, सोन्याचे उत्पादन स्थिर राहते
आता कोणत्याही गुंतवणूकदारासमोर 'क्ष' आणि 'ज्ञ' हे ढिग ठेवले तर, तो कोणत्या ढिगाची निवड करेन? नक्कीच 'ज्ञ' या ढिगाची निवड करेन. या पाठिमागचे कारण सांगताना बफेट म्हणतात, खरेदी केलेली जमीन तुम्हाल नेहमी चांगाला फायदा देईल. कारण जमीनीची किंमत सतत वाढत राहिल. तर, सोन्याची किंमत वाढली तरी, त्याचे उत्पन्न तेवढेच राहील.
... म्हणून करा वेळीच विचार
त्यामुळे तुम्ही जर सोन्यात गुंतवणूक करत असाल तर, वेळीच विचार करा. अनेकदा कर वाचविण्यासाठी सोन्यात गुंतवणूक केली जाते. पण, आता कर वाचविण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. जे तुम्हाला दीर्घकालीन फायदा मिळवून देऊ शकतात.