अकरावी ऑनलाईन प्रवेशाची वेबसाईट सुसाट
अकरावी ऑनलाइन प्रवेशाची वेबसाइट दोन दिवस ठप्प राहिल्यानंतर आज पुन्हा सुरू झाली आहे.
मुंबई : अकरावी ऑनलाइन प्रवेशाची वेबसाइट दोन दिवस ठप्प राहिल्यानंतर आज पुन्हा सुरू झाली आहे. सकाळी सात वाजल्यापासून वेबसाईट सुरू झाली आहे.
दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आली होती. ही दुरुस्ती यशस्वी झाल्याचं दिसतं आहे.तासाभरात एक लाख विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत.
जसंजसा दिवस पुढे जाईल, तसा तशी अर्ज भरणाऱ्यांची संख्या वाढत जाईल. एकाच वेळी अनेक विद्यार्थी अर्ज भरतील, त्यावेळी वेबसाईट तग धरते का? हे बघणे औत्सुक्याचे असणाऱ आहे.