या १० सुंदर फोटोंमध्ये पाहा मिस वर्ल्ड मानुषीचा `हॉट` अंदाज
शनिवारी मिस वर्ल्डचा किताब पटकावलेल्या मानुषी छिल्लरने संपूर्ण जगात आपली ओळख निर्माण केली आहे.
नवी दिल्ली : शनिवारी मिस वर्ल्डचा किताब पटकावलेल्या मानुषी छिल्लरने संपूर्ण जगात आपली ओळख निर्माण केली आहे.
१६ वर्षांपूर्वी २००० मध्ये प्रियंका चोप्राने हा किताब भारतात आणला होता. मानुषीने सान्या शहरातील एरिनामध्ये आयोजित असलेल्या या समारंभात ११८ सुंदरिंना मागे टाकत हा किताब पटकावला. मानुषी छिल्लर हरियाणा येथे राहणारी असून तिने यंदा फेमिना मिस इंडिया २०१७ हा किताब पटकावला आहे.
मानुषी छिल्लरच्या अगोदर रीता फारिया (१९६६) ऐश्वर्या राय (१९९४) डायना हेडन (१९९७) युक्ता मुखी (१९९९) आणि प्रियंका चोप्रा (२०००) यांनी हा किताब पटकावला आहे. यामधील ऐश्वर्या आणि प्रियंका चोप्रा ही अशी नावं आहेत जी बॉलिवूडमध्ये कायम असून इतरांसाठी एक उत्तम उदाहरण आहेत. यामधील रीता फारियाला वगळता डायना हेडन आणि युक्ता मुखी देखील बॉलिवूडमध्ये आपल्याला दिसत आहेत. आता सगळ्यांचे लक्ष मानुषी छिल्लरकडे आहे.
आयएएनएसला दिलेलया मुलाखतीमध्ये मानुषीने सांगितलं की, जर मला योग्य संधी मिळाली तर मी बॉलिवूडमध्ये येण्यास तयार आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की मानुषी अगोदरच बॉलिवूडचा विचार करत होती. त्यामुळे आता साऱ्यांचं लक्ष मानुषीच्या बॉलिवूड एन्ट्रीकडे लागलं आहे.
मानुषीला नृत्य, गायन, कविता लेखन आणि चित्रकलेची आवड आहे. ती म्हणते की, कोणतेही काम करण्यासाठी मर्यादा नाही. आपली स्वप्ने अनंत आहे. स्वतःवर विश्वास ठेवून कोणतीही गोष्ट करणे महत्वाचे आहे. ती सांगते की, याच विचारांनी माझ्या आई-वडिलांनी माझं पालन पोषण हरियाणात केलं.
मानुषी सांगते की, मी खूप पुण्यवान आहे की, मला असे आई बाबा भेटले. ज्यांना बसून मला सांगाव लागलं नाही की मला नेमकं काय करायचं आहे. त्या दोघांचं कायम माझ्यावर लक्ष होतं आणि त्यांना कळत होतं की मला काय हवं आहे. लहानपणापासून ते मला सांगत होते की, तुला हवं ते तू कर. त्यामुळे मला हे यश मिळवणं सहज सोपं झालं.
मॉडेलिंगचं हे जग मानुषीच्या कुटुंबियासाठी नवीन आहे. तिच्या कुटुंबातील मंडळी शिक्षणाला अधिक महत्व देतात. आणि त्यांचा मनोरंजन उद्योग आणि सौंदर्य स्पर्धांवर फार विश्वास नाही.
तिच्या कुटुंबातून आणि मित्र परिवारातून मॉडलिंग क्षेत्रात येणारी ही पहिली व्यक्ती आहे. मानुषी जेथे चिकित्सा विज्ञान क्षेत्रात असून तिची बहिण वकिलीचा अभ्यास करत आहे. आणि लहान भाऊ अजूनही शाळेत आहे.
२० वर्षाच्या मानुषीने दिल्लीच्या सेंट थॉमस स्कूल आणि सोनीपतच्या भगत फूल सिंह गर्व्हमेंट मेडिकल कॉलेज फॉर वुमनमधून शिक्षण घेतलं, आहे. हरियाणाची मानुषी ५४ वी फेमिना मिस इंडिया वर्ल्ड २०१७ असून जम्मू काश्मिरची सना ही पहिली रनर अप आणि बिहारची प्रियंका कुमारी रनर अप घोषित केली आहे.