मुंबई : आज आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे. या निमित्ताने प्रत्येक महिलेने पाहिला हवेत असे १० सिनेमे. ते बघताना तुम्हाला त्यात तुमचे वर्तमान आणि भविष्य जाणवेल.


पीकू


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वडील आणि मुलीचे नाते कमी सिनेमात दाखवले जाते. या नात्यावर आधारित शुजीत सरकारचा पीकू हा अनोखा सिनेमा.


पिंक


झालेल्या अत्याचारावर न्याय मिळवणाऱ्या मुलीची कथा यात दाखवण्यात आली आहे.


तेरे संग


टीनएजमध्ये होणारे प्रेम दाखवणारा हा सिनेमा २००९ मध्ये प्रदर्शित झाला होता. प्रेमातून घडलेली चूक जीवन कसे बदलवते, ते दाखवणारा हा सिनेमा सतिश कौशिक यांनी दिग्दर्शित केला होता.


इंसाफ का तराजू


राज बब्बर आणि जीनत अमान यांचा हा सिनेमा हिट होता. या सिनेमाला अनेक पुरस्कारही मिळाले होते. या सिनेमा अमेरिकी सिनेमा लिपस्टिकवर आधारित होता.


 


लज्जा


अनेक अभिनेत्रींच्या अभियनायाने नटलेला सिनेमा लज्जा. हा सिनेमा महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर महिलांनी उचलेले पाऊल यावर बेतला आहे.


फॅशन


आधुनिक जगात आपले फॅशन विश्वातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी केला जाणारा संघर्ष अगदी सत्य रुपात या सिनेमात दाखवण्यात आला आहे. 


दामिनी


एका घराची सून असूनही त्याचे दडपण न बाळगता होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडणारी स्त्री यात दाखवण्यात आली आहे.


क्वीन


कंगणाचा हा कमाल सिनेमा अजिबात मिस करू नका.


अर्थ


१९८२ मध्ये आलेल्या या सिनेमा विवाहबाह्य संबंधांवर भाष्य करतो.


क्या कहना


कुमारी मातेचे समाजातील स्थान दर्शवणारा हा सिनेमा. तिचा आयुष्यातील संघर्ष पाहण्यासारखा आहे.