मुंबई : विरूष्का'' सध्याचं चर्चेतील नाव. बॉलिवूड आणि क्रिकेटमधील दोन अशा व्यक्ती ज्यांनी करिअरमध्ये आपली एक वेगळी उंची गाठली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या गोंडस चेहऱ्याने आणि उत्तम अभियाने अनुष्का शर्मा ही सर्वांचींच आवडती आहे. तर अगदी कमी वेळात आपल्या बॅटने सगळ्यांचं मन जिंकलेला विराट कोहली. हे दोघेही एक जोडी म्हणून आदर्श ठरले आहेत. आणि त्याला कारण देखील तसंच काहीस आहे. 


या दोघांच्या लग्नाची चर्चा अनेक दिवसांपासून रंगली होती. अखेर त्या चर्चेला 11 डिसेंबर रोजी पूर्ण विराम मिळाला. या दोघांनी इटलीच्या साऊथ स्तित असलेल्या बोर्गो फिनोचितो या हॉटेलमध्ये आपला विवाह सोहळा संपन्न केला. हा सोहळा खाजगी स्वरूपात साजरा करण्यात आला. 


या लग्नाची खास बात म्हणजे बोर्गो फिनोचितो हे हॉटेल फक्त मे महिन्यात उघडतं मात्र या दोघांच्या लग्नाखातर हे हॉटेस खास हिवाळ्यात उघडण्यात आलं. आणि त्यांच्या आयुष्यातील हा अगदी महत्वाचा क्षण इथे साजरा करण्यात आला. या दोघांच्या विवाहाने फक्त बॉलिवूड आणि क्रिकेट जगतातील मंडळ खूष झाली तर असं नाही ही दोघं अगदी सामान्यांसाठी देखील खास होती. या दोघांच्या लग्नाने त्यांचा प्रत्येक चाहता आनंदी आहे. आणि प्रत्येकाने आपला आनंद फेसबुक आणि व्हॉट्सअॅप प्रोफाईल, स्टेटस ठेवून व्यक्त केला आहे. पण या दोघांमधील अनेक गोष्टी अशा आहेत ज्या सगळ्यांसमोर आलेल्या नाही. आणि हीच कारणं त्यांच्या नात्यातील काही अनोख्या गोष्टी आपण आज इथे पाहणार आहोत. 


१) शाहरूखमुळे आज ते दोघे लग्नबंधनात 


गोंधळलात ना? पण हे अगदी खरं आहे. या दोघांचा विवाह झाला त्याचं मूख्य कारण शाहरूख आहे. शाहरूख खानने आयपीएलच्या एका सोहळ्यात चक्क क्रिकेटर विराट कोहलीचा ''स्वयंमवर'" रचला होता. आणि यामध्ये विराट कोहलीचं लग्न अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत लावलं होतं. त्यामुळे त्यांच्या आजच्य़ा एकत्र येण्याला शाहरूख खानच कारणीभूत आहे. 


२) विररूष्काचा खरेपणा 


विराट आणि अनुष्का ही दोन अशी नावं ज्यांनी आपापल्या करिअरमध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलंय. विराट आपल्या क्रिकेटच्या क्षेत्रात अव्वल आहे. त्याचं सातत्यपूर्ण काम हेच याची पावती देत आहे. विराटच्या कॅप्टनशीपबाबत आपण पाहतोच. भारताला चांगले सामने त्याने खेळवून दिले आहेत. तसेच अनुष्का शर्माच्या बाबतीत. अनुष्का शर्मा हे देखील बॉलिवूडमधील वेगळं नाव जे कायम वेगवेगळे प्रयत्न करताना दिसतं. त्यामुळे या दोघांची अव्वल जोडी होण्यासाठी दोघांचा करिअरमधला फोकस जास्त महत्वाचा ठरला. 


३) भांडण झाली पण साथ सोडली नाही 


विराट - अनुष्काची देखील सामान्य कपलप्रमाणे भांडण झाली. पण त्यांनी एकमेकांची साथ सोडली नाही. अनुष्काने मेन्स मॅगझिनच्या कव्हर पेजसाठी फोटोशूट केलं. मात्र हे फोटोशूट विराटला रुचलं नाही. आणि त्याने त्याचं तस मत व्यक्त देखील केल मात्र त्याने अनुष्काची साथ सोडली नाही. तो प्रत्येक क्षणी तिच्यासोबत राहिला. मग ते ट्रोल झाल्यावर असो वा तिला टार्गेट केल्यावर असो ते दोघे एकमेकांसोबत खंबीरपणे उभे राहिले. 


४) दोघांनी सांभाळलेली एक साधी गोष्ट 


विराट आणि अनुष्काकडे एक खास लॉकेट आहे. ज्यातून त्या दोघांच प्रेम स्पष्ट होतं. एकदा एअरपोर्टवर विराट अनुष्का कॅमेऱ्यात कैद झाले. आणि त्यांचा तो फोटो व्हायरल झाला. या व्हायरल झालेल्या फोटोत दोघांकडे सारखंच "डॉग"च लॉकेट असल्याचं दिसलं. यावरून कळतं की ते किती छोट्या गोष्टी फॉलो करून आनंद मिळवतात.


५) विराट अनुष्काचं किती ऐकतो 


प्रत्येक प्रियकर म्हणा किंवा नवरा तो आपल्या लाईफ पार्टनरच्या सगळ्या गोष्टी ऐकतो. तसंच काहीस विरूष्काच्या नात्यात देखील आहे. विराटने दाढी वाढवली होती. आता दाढी वाढवणारा बॉयफ्रेंड कुणाला आवडत नाही. तर अनुष्काने त्याला दाढी न करण्याचा सल्ला दिला. आणि विराटने तो फॉलो देखील केला. मात्र विराटने त्यांचं हे मत आपल्या क्रिकेट खेळाडूतील इतर मित्रांना सांगितलं. 



६) यावेळी विराट वागला अगदी टिपीकल 


खुबसुरती डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार विराट अनुष्काचा वाद एकदा विकोपाला गेला होता. या वेबसाईटच्या माहितीनुसार विराट अनुष्काच्या फिल्मी करिअरवर नाखूष होता. आणि त्याने तिला हे क्षेत्र सोडून देण्याचा सल्ला दिला होता. विराट कोहली आणि अनुष्का यांच्यातील वाद काही लपले नाहीत. जसं त्यांच प्रेम जगासमोर आलं तशीच त्यांची भांडण देखील. विराट कोहलीला अनुष्काचं फिल्मी करिअर एकदा खटकलं. आणि एका वेळी अनुष्काचे सिनेमे देखील तेवढे चालत नव्हते. तेव्हा अनुष्काने आपलं बॉलिवूड करिअर थांबवावं असा सल्ला विराटने दिला. मात्र तसं काही झालं नाही. पण एवढ्या चढ उतारानंतरही दोघे एकमेकांसोबत छान राहिले. 


७) विरूष्काची अशी झाली पहिली ओळख


दोघांच्या पहिल्या भेटीबाबत अजून संभ्रम आहेच. विराट अनुष्काची पहिली भेट ही एका शॅम्पू अॅड शूटमुळे झाली असं सांगितलं जातं. मात्र आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार विराट - अनुष्काची पहिली भेट ही रणवीर सिंहने करून दिली आहे. 


८) दोघांनी दिली एकमेकांना साथ 


अनेकदा आपण पाहिलं आहे, विराटच्या क्रिकेट क्षेत्रातील खराब कामगिरीला अनुष्काला टार्गेट करण्यात आलं. तिला सोशल मीडियावर ट्रोल करून ती विराटसाठी अनलकी असल्याचं मत देखील नेटीझन्सने मांडलं. मात्र त्या प्रसंगातही विराट अनुष्कासोबत खंबीरपणे उभा राहिला. आणि चाहत्यांना सडेतोड उत्तर दिलं. 


९) एकमेकांना वेळ देणं 


विराट आणि अनुष्का अनेक सोशल इव्हेटंमध्ये आपल्याला एकत्र दिसले. आपल्या व्यस्त शेड्युलमधून हे दोघेही एकमेकांना वेळ देत असतं. दोघांना वेळ देण्यासाठी कधी फक्त लाँग विकेंडचा विचार केला तर तसं नाही. हे दोघे अगदी साध्या कार्यक्रमात म्हणजे वृक्षारोपण असो किंवा अजून काही हे दोघेही एकत्र दिसले. 


१० ) एकमेकांच्या कामाचं कौतुक 


विराट आणि अनुष्का ही दोन अशी नावं जी आपापल्या क्षेत्रात व्यस्त. मात्र असं सगळं असूनही अनुष्का अनेकदा विराटचा खेळ पाहण्यासाठी स्टेडिअममध्ये गेली आहे. अनेकदा ती विराटला भेटण्यासठी त्याच्या परदेश दौऱ्यांवर देखील गेली आहे. तसंच काहीस विराटचं देखील आहे विराट आपल्या खेळात इतका व्यस्त असताना अनुष्काचे सिनेमे आवर्जून पाहतो. तर एवढंच नाही तर तो आवर्जून त्यांच कौतुक करून चाहत्यांना सांगतो.