100 Years: The Movie You Will Never See: चित्रपट हे एक प्रभावी माध्यमं आहे. एक चित्रपट पाहिल्यानंतर आपल्यावर त्याचा किती परिणाम होतो हे आपण (Movie Which Release in 2115) आपल्या स्वानुभावातून चांगलंच सांगू शकतो. जगभरातही असे अनेक सिनेमे आहेत ज्यांचा आपल्यावर प्रत्यक्ष आणि प्रत्यक्षपणे परिणाम होता. त्यासोबतच चित्रपट कलाकृतीमध्ये आजच्या काळात नाना तऱ्हेचे प्रयोगही होताना दिसत आहेत. हे प्रयोग यशस्वीही होत आहेत. सध्या असाच एक आगळावेगळा प्रयोग चर्चेत आला आहे. एक नवा चित्रपट पाहण्यासाठी तुम्ही किती दिवस वाट पाहू शकता? फार फारतर 15 दिवस परंतु असा एक चित्रपट आहे जो पाहण्याासाठी तुम्हाला चक्क आयुष्याची 100 वर्षे पुर्ण करावी लागणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा चित्रपट 2115 मध्ये प्रदर्शित होईल. असा कोणता चित्रपट आहे जो आजपासून तब्बल 92 वर्षांनी म्हणजे 2115 साली प्रदर्शित होणार आहे? तुम्हाला ऐकायला थोडंस विचित्र वाटेल आणि हे ऐकून तुम्हाला खरं वाटणार नाही परंतु हे खरं आहे. '100 इयर्स - द मूव्ही यू विल नेवर सी' (Movie Name of Film That Will Release in 2115) असं या आगळ्यावेगळ्या चित्रपटाचे नावं आहे.


2115 साली हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. पण कसा? तो पर्यंत कोण जिवंत राहिलं? आणि हा चित्रपट प्रदर्शित करणार कोण? आज प्रदर्शित झालेला चित्रपट तेव्हा कोण प्रदर्शित करेल? असं करण्यामागचं कारण काय असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. परंतु याची उत्तर अद्याप समोर आलेली नाहीत. (100 years the movie you will never see movie will release in 2115 read the full story)


हेही वाचा - Rules Changes From 1st May: आजपासून नवे नियम लागू, तुमच्या खिशावर कसा होईल परिणाम?


या चित्रपटात नेमंक काय पाहिलं जाईल हे आपल्याला मात्र पाहता येणार नाही. त्यामुळे या चित्रपटाचे नावंही काहीसं असंच आहे. या चित्रपटाचा विषयही समोर आलेला नाहीये. याची कथा जॉन मालकोविच यांनी लिहिली आहे. यात त्यांनी अभिनयही केला आहे. रॉबर्ट रॉड्रिग्ज यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. हा चित्रपट एका डिजिटल प्रतीत हाय टेक तिजोरीत सुरक्षित ठेवला जाणार असल्याचे कळते आहे. या चित्रपटाची तिकिटंही या चित्रपटातील कलाकारांना देण्यात आली आहेत. 



हा चित्रपट 18 नोव्हेंबर 2115 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात नक्की काय दाखवलं जाणार आहे याची कोणालाही कल्पना नाही. त्यामुळे अशा या चित्रपटाची उत्सुकताही आहे. या चित्रपटाचा टिझरही प्रदर्शित झाला आहे. जो युट्यूबर उपलब्ध आहे. यापुढेही असे काही प्रयोग चित्रपटसृष्टीत होताना दिसतीलही. परंतु हा प्रयोग यशस्वी कसा होईल हे पाहण्यासाठी त्या काळातील माणसं असतील.