मुंबई : डेस्टिनेशन वेडिंग प्लान केलेल्या प्रार्थना बेहरेचा विवाहसोहळा गोव्यात आज पार पडला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुळची बडोद्याची असलेल्या या अभिनेत्रीने आपला विवाह सोहळा गोव्यात पार पाडला. प्रार्थना बेहरेचे अरेंज मॅरेज आहे यावर अनेकांचा विश्वास बसत नाही. प्रार्थनाने आपल्या पालकांच्या पसंतीच्या मुलाशी लग्न केले आहे.  एका मॅरेज ब्युरोच्या मदतीने अभिषेक आणि प्रार्थनाची ओळख झाली. इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं की, ‘जेव्हा तुमच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावर आनंद झळकतो, तेव्हा तुम्हाला माहित असतं की तुम्ही योग्य निर्णय घेतलेला आहे.’


ऑगस्ट महिन्यात प्रार्थना बेहरेचा अभिषेक जावकरसोबत साखरपुडा झाला. प्रार्थना ही उत्तम अभिनेत्री आहे याची कल्पना आपल्याला आहेच. पण तिचा साथीदार नेमकं काय करतो? हे जाणून घेण्याची साऱ्यांचीच इच्छा आहे. या दोघांची पहिल्या ओळखीपासून आतापर्यंत सारं काही जाणून घ्या.




कोण आहे अभिषेक जावकर? 


अभिषेक जावकर लेखक, दिग्दर्शक, निर्माता आहे 
अभिषेकला फिरण्याची प्रचंड आवड असून त्याला वाईन प्यायला आवडते
अर्थशास्त्रात पदवीधर असलेल्या अभिषेकला परदेशात जाऊन एमबीए करण्याची इच्छा होती
अभिषेक कॉलेजच्या दिवसांमध्ये इव्हेंट मॅनेजमेंटसाठी काम करत असे



त्यावेळी त्याला मित्राने चित्रपट निर्मितीबद्दल सांगितले आणि त्यानंतर तो या क्षेत्रात गुंतला 
त्यानंतर त्याने फॉक्स एण्टरटेंमेन्ट आणि हिस्टरी वाहिनीसाठी माहितीपट तयार करण्यास सुरुवात केली
अभिषेकने काही तेलगू चित्रपटांचे वितरण केले आणि तो तेथे यशस्वीही ठरला. 
मूळ ‘सिंघम’ चित्रपटाची निर्मितीही अभिषेकनेच केलीये. ‘यमुदू’, ‘गोलिमार’ आणि तेलगूमध्ये डब केलेल्या ‘हॅरी पॉटर’ सीरिजचे वितरणही अभिषेकनेच केले.



जवळपास दोन वर्षांपूर्वीच त्याने रेड बल्ब स्टुडिओज नावाची स्वतःची निर्मितीसंस्था सुरु केली. 
‘डब्बा ऐस पैस’, ‘शुगर, सॉल्ट आणि प्रेम’ या मराठी चित्रपटांची सहनिर्मिती त्याने केली आहे. 
‘मिसिंग ऑन अ वीकेंड’ या हिंदी चित्रपटातून अभिषेकने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले.