नवी दिल्ली : रजनीकांत, अक्षय कुमार आणि एमी जॅक्सन सारखी तगडी स्टारकास्ट असलेला '2.0' (Robot 2.0)सिनेमाने पहिल्या दिवशी तगडी कमाई केलीय. याचं हिंदी वर्जनही लोकांच्या चांगलच पसंतीस पडलेल पाहायला मिळतय. फिल्म एक्सपर्ट रमेश बालाने केलेल्या ट्वीटनुसार  '2.0' सिनेमाच्या हिंदी वर्जनने पहिल्या दिवशी साधारण 25 कोटींची कमाई केलीय. हे सुरूवातीच्या सत्रातले आकडे असून वाढण्याची शक्यता त्याने वर्तवली आहे.


500 कोटींचा सिनेमा 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रजनीकांत आणि अक्षय कुमारच्या या सिनेमात जबरदस्त टेक्नॉलॉजीचा वापर केलाय. साधारण 500 कोटी इतका सिनेमाचा बजेट आहे. सिनेमा बद्दल मिक्स रिव्ह्यू पाहायला मिळत आहेत पण यातील ग्राफीक्स सर्वांनाच आवडलंय.  सिनेमाची कहाणी उगीच ताणलेली वाटतेय. पण रजनीकांतच्या फॅन्सनी सिनेमाला डोक्यावर घेतलंय.


वैज्ञानिक कल्पना



चित्रपटाचा विषय एका वैज्ञानिक कल्पनेवर आधारित असून चित्रपटाची निर्मिती 3डी स्वरूपात करण्यात येणार आहे. हॉलीवूडच्या तोडीस तोड असलेल्या 2.0 या चित्रपटाचं बजेट तब्बल 500 कोटी रुपये एवढं आहे. या चित्रपटात रजनीकांत आणि अक्षयकुमारबरोबरच एमी जॅक्सन, सुधांशु पांडे, आदिल हुसैन सारखी तगडी टीम दिसतेय.


अक्षयसाठी खास 




'2.0' सिनेमाचा हिरो भलेही रजनीकांत आहे पण बॉलीवुड स्टार अक्षय कुमार देखील दमदार खलनायकाच्या भुमिकेत दिसतोय. सिनेमाला मिळालेल्या ग्रॅण्ड ओपनिंगमुळे हा सिनेमा अक्षयसाठी देखील खास असणार आहे. अक्षयच्या आतापर्यंतच्या सिनेमात 'गोल्ड'ने पहिल्या दिवशी 25.25 कोटी रुपयांचे कलेक्शन केलं होतं. '2.0' चं हिंदी वर्जन पहिल्या दिवशी 30 कोटीहून अधिक कमाई करेल असं मानलं जात आहे.


पहिल्या दिवशीच रेकॉर्ड 


काही दिवसांपुर्वी आलेल्या ठग्ज ऑफ हिंदुस्तानने हिंदी आणि अन्य भाषांमध्ये मिळून पहिल्या दिवशी 70 कोटींची कमाई केली. '2.0'  सिनेमातही तितकीच तगडी स्टारकास्ट आहे. त्यामुळे  'ठग्ज ऑफ हिंदुस्तान' चा रेकॉर्ड आरामात तुटेल यात शंका नाही.