मुंबई : आमीर खान, अमिताभ बच्चन स्टारर असलेला ठग्स ऑफ हिंदुस्तान हा सिनेमा 8 नोव्हेंबर रोजी रिलीज झाला. हा सिनेमा रिलीज होताच अवघ्या काही वेळातच ऑनलाइन लीक झाला. दिवाळीच्या या सणाला साऊथचा सुपरस्टार विजयचा सरकार हा सिनेमा देखील रिलीज झाला आणि काही वेळातच लीक झाला. आता ऑनलाइन सिनेमा लीक करणारी लोकप्रिय वेबसाइट तमिल रॉकर्सचं लक्ष अक्षय कुमार आणि रजनीकांतच्या 2.0 या सिनेमाकडे आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2.0 हा जेवढा मोठा प्रोजेक्ट आहे तेवढाच त्याला धोका देखील अधिक आहे. या सिनेमाला सर्वात मोठा धोका हा लीक होण्याचा आहे. असं झालं तर सिनेमाला खूप नुकसान होईल. कारण वेबसाइटने आपल्या अनवेरिफाइड ट्विटर हँडलवरून हा सिनेमा लिक करण्याची गोष्ट केली आहे. 


त्याने ट्विटमध्ये लिहिलं आहे की, 2. o लवकरच तमिळ रॉकर्सवर येत आहे. साऊथ सिनेमा तमिळ रॉकर्स देखील या साईटवर लिक झाला होता. या सिनेमाने 2 दिवसांतच 100 करोड रुपयांचा आकडा पार केला आहे. सिनेमा लीक झाल्यामुळे याचा परिणाम सिनेमाच्या कलेक्शनवर झाला आहे. 


एवढंच नाही तर ख्रिसमसच्या दिवशी शाहरूख खानचा झिरो हा सिनेमा रिलीज होणार आहे. तमिळ रॉकर्सची नजर शाहरूख खानच्या सिनेमावर देखील आहे. आता महत्वाची बाब ही असेल की, मेकर्स पायरसी रोखण्यासाठी काय करणार?