मुंबई : सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षय कुमार यांच्या सिनेमाने 2.0 ने चांगलीच पकड धरली आहे. 29 नोव्हेंबरला बॉक्स ऑफिसवर रिलीज झालेला हा सिनेमा धुमाकूळ घालत आहे. सायन्स फिक्शनवर आधारित हा सिनेमा सगळ्या वयातील प्रेक्षकांनी पसंत केला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिग्दर्शन शंकर या सिनेमाने 4 दिवसांत 400 करोड रुपये वर्ल्डवाइड कलेक्शन केलं आहे. तामिळनाडूमध्ये या सिनेमाने आतापर्यंत 149.51 करोड रुपयांची कमाई केली आहे. रजनीकांतचे चाहते सिनेमाघरात पोहोचले आहेत. 


फक्त देशातच नव्हे तर विदेशात या सिनेमाने धुमाकूळ घालत आहे. ट्रेड अॅनालिस्ट रमेश बाला यांच्यानुसार, अमेरिकी बॉक्स ऑफिसवर हा तिसरा सिनेमा आहे. ज्याने 5 मिलियन डॉलर म्हणजे 35.62 करोड रुपयांची कमाई केली आहे. या अगोदर पद्मावत आणि संजूने देखील अशीच कमाई केली आहे. 



सिनेमाच्या हिंदी वर्जनबद्दल बोलायचं झालं तर तरण आदर्शने ट्विट करून याची माहिती दिली आहे. 2.0 ने आपला स्पीड कायम ठेवला आहे. शनिवारी शुक्रवारच्या अपेक्षेपेक्षा जास्त कमाई झाली. 56.41 टक्क्यांनी कमाईत वाढ झाली. रिलीजच्या दुसऱ्या शुक्रवारी सिनेमाने 5.82 करोड आणि शनिवारी 9.15 करोड रुपयांची कमाई केली आहे. याचप्रकारे आतापर्यंत 154 करोड रुपयांचा बिझनेस केला आहे.



विशेष तज्ञांच्या माहितीनुसार, जगभरात या सिनेमाने 623.19 करोड बिझनेस केला आहे. सिनेमाचं बजेट 600 करोड रुपये असून हा सिनेमा तेलुगु, तमिळ आणि हिंदी भाषेत एकून 6800 स्क्रीनवर रिलिज झाला. 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या रोबोट या सिनेमाचा '2.0' हा सिक्वल आहे. ज्या सिनेमात ऐश्वर्या राय बच्चन देखील होती.