मुंबई : अक्षय कुमार आणि रजनीकांत यांचा 2.0 हा सिनेमा रिलीज होऊन आता 20 दिवस झालेत. असं असलं तरीही हा सिनेमा आतापर्यंत टॉपवर राहिला आहे. 2.0  या सिनेमाच्या रिलीजपासून आतापर्यंत अनेक सिनेमे प्ररदर्शति झाले. पण आतापर्यंत या टक्करमध्ये एकही सिनेमा टिकलेला नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

7 डिसेंबर रोजी सारा अली खानचा 'केदारनाथ' हा सिनेमा रिलीज झाला तर शुक्रवारी हॉलिवूडचा एक्वामॅन सिनेमा रिलीज झाला. पण हे सिनेमे देखील रजनीकांतच्या सिनेमाला टक्कर देऊ शकली नाही. 


बॉक्स ऑफिसच्या रिपोर्टनुसार तिसऱ्या आठवड्यातही 2.0 चेन्नई बॉक्स ऑफिसवर टॉपमध्ये आहे. या सिनेमाने चेन्नईत एकूण 22.37 करोड रुपयांचा बिझनेस केला आहे. आतापर्यंत एकाही सिनेमाने असं केलेलं नाही. 


रमेश बाळा यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे की, रजनीकांत यांच्या 2.0 या सिनेमाने विजयच्या सरकार सिनेमाला देखील मागे टाकलं आहे. 2.0  हा सिनेमाने तामिळनाडूत सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. 



2.0 या सिनेमाने वर्ल्डवाइड कलेक्शनमध्ये 700 करोडहून अधिक आकडा गाठला आहे. सायन्स फिक्शनवर आधारित असलेला हा सिनेमा जगभरात जबरदस्त कमाई करत आहे. अमेरिकेत 2.0 हा सिनेमा एकूण 100 स्क्रिनवर रिलीज झाला आहे. तर बॉक्स ऑफिस इंडियानुसार 2.0 ने तिसऱ्या आठवड्यात हिंदी वर्झनने 6 करोड रुपयांची कमाई केली आहे. एकूण या सिनेमाने आतापर्यंत 181 करोड रुपयांची कमाई केली आहे.