2.0 ठरला सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा
9 दिवसांत कमावले एवढे रुपये
मुंबई : 2.0 हा सिनेमा प्रदर्शित होऊन 9 दिवस पूर्ण झाले आहेत. या सिनेमाने अतिशय सुंदर कलेक्शन केलं आहे. या सिनेमाचा आता दुसरा विकेंड सुरू झाला आहे. रजनीकांत आणि अक्षय कुमार यांची जुगलबंदी या सिनेमात पाहायला मिळत आहे. या सिनेमाने अगदी सुरूवातीपासूनच रेकॉर्ड रचण्यास सुरूवात केली आहे.
हा सिनेमा उत्तर प्रदेश, बिहार आणि गुजरातमध्ये चांगलीच कमाई करत आहे. या सिनेमाने आता चांगली पकड जमवली आहे. 7 डिसेंबर रोजी सारा अली खानचा डेब्यू सिनेमा 'केदारनाथ' प्रदर्शित झाला आहे.
या सिनेमाची 2.0 या सिनेमासोबत टक्कर होण्याची शक्यता अनेकांनी वर्तवली आहे. पण क्रिटिक्सकडून मात्र समिश्र प्रतिक्रिया आहेत. आता असं म्हटलं जातंय की, 2.0 ने आपली चांगली पकड धरली आहे.
बॉक्स ऑफिस इंडियानुसार शुक्रवारी या सिनेमाच्या हिंदी वर्जनने 5.75 ते 6 करोड रुपये कमाई केली. गुरूवारी या सिनेमाच्या कमाईट घसरण पाहायला मिळाली. 20 ते 25 टक्के घसरण पाहायला मिळाली. 9 दिवसांत आतापर्यंत 143.50 करोड रुपयांची कमाई केली आहे.