मुंबई : महाराष्ट्राला याड लावलेला सैराट सिनेमा लवकरच हिंदीमध्ये रिलीज होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जान्हवी कपूर आणि ईशान खट्टरची भूमिका असलेला धाडक हा सुपर हिट मराठी चित्रपट सैराटचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाला करण जोहर प्रोड्यूस करणार आहे तर शशांक खेतान हा सिनेमा दिग्दर्शित करणार आहे. 


सैराटमध्ये अर्ची आणि परश्याची एक प्रेमकथा आहे. जी महाराष्ट्रातील जातीय व्यवस्थेवर भाष्य करणारी आहे. पण हिंदी रिमेक राजस्थानातील कथेवर आधारीत असणार आहे. 


15 नोव्हेंबरला करण जोहरने सिनेमाचा पहिला लूक शेअर करुन सगळ्यांना धक्का दिला. काही दिवसांनंतर फराह खान सैराटमधील प्रसिद्ध झालेलं गाणं झिंगाट गाण्याची कोरिओग्राफी करणार आहे अशी माहिती त्याने दिली. झिंगाटनंतर आता याड लागलं हे गाणं देखील या सिनेमाचा भाग असणारा आहे. सैराट हा भारतातील पहिला भारतीय चित्रपट होता ज्याचे गाणे हॉलिवूडमधील सोनी स्कोरिंग स्टुडिओत रेकॉर्ड केले गेले. 


इंडिया.कॉमला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलेल्या या दोन्ही गाण्याचं म्यूझिक करण जोहर त्याच्या या हिंदी रिमेकमध्ये वापरणार आहे. या दोन गाण्यांनी सिनेमाला खूप प्रसिद्ध केलं. त्यामुळे करण देखील त्याचा वापर आपल्या हिंदी रिमेकमध्ये करणार आहे.


श्रीदेवीच्या अकाली मृत्यूमुळे ही शूटिंग काही आठवड्यांपर्यंत थांबविण्यात आली होती. गेल्या आठवड्यातच जान्हवीने चित्रपटाच्या शूटिंग सुरु केले होते. करण सेटवर सहज सोयीस्कर असं वातावरण बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे ज्यामुळे जान्हवीला काही अडचण होणार नाही. चित्रपट २० जुलै २०१८ ला रिलीज होणार असल्याचं देखील सूत्रांनी म्हटलं आहे.