मेगास्टार अमिताभ बच्चन गेल्या काही दिवसांपासून क्विझ रिऍलिटी शो 'कौन बनेगा करोडपती सिझन 16' मध्ये सध्या व्यस्त आहेत. केबीसी 16 चे नवे एपिसोड 12 ऑगस्ट रोजी सुरु झाला आहेत. आता याचा 32 वा एपिसोड आहे. आता या सिझनचा पहिला करोडपती स्पर्धक मिळाला आहे. जम्मू काश्मिरचा चंद्र प्रकाश, जो यूपीएससीचा उमेदवार आहे. मागच्या एपिसोडमध्ये चंद्र प्रकाशने 1 कोटी रुपयांसाठींचा प्रश्नाचं उत्तर दिलं. चंद्र प्रकाश हा पहिला करोडपती बनला आहे. चंद्रप्रकाशने एक कोटी जिंकल्यानंतर आता तो जॅकपॉटचा धनी होणार का? 


7 कोटी रुपयांसाठी विचारण्यात आला प्रश्न 



KBC16 चा पहिला करोडपती झाल्यानंतर चंद्र प्रकाशला 7 कोटी रुपयांच्या जॅकपॉट प्रश्नाचा सामना करावा लागला. बिग बींनी त्यांना 7 कोटी रुपयांचा 16 वा प्रश्न विचारला. जो होता - 1587 मध्ये उत्तर अमेरिकेत इंग्रजी पालकांना जन्मलेले पहिले रेकॉर्ड केलेले मूल कोण होते? त्याचे पर्याय होते- A: Virginia Dare, B: Virginia Hall, C: Virginia Coffee आणि D: Virginia Sink.


चंद्रप्रकाशने 7 कोटींचा प्रश्न सोडला



7 कोटी रुपयांच्या जॅकपॉटच्या प्रश्न स्क्रिनवर आल्यावर चंद्र प्रकाश यांनी तो  प्रश्न समजून घेतला. मात्र पर्यायांबद्दल कोणतीच माहिती नसताना त्याने तो गेम सोडला आणि 1 कोटी रुपये घेतले. 


चंद्रप्रकाश कोण आहे? 


जम्मू-काश्मीरमधून आलेला स्पर्धक चंद्र प्रकाश याने अनेक कठीण प्रसंगांना तोंड दिले आहे. चंद्र प्रकाश यांनी शो दरम्यान सांगितले की, जेव्हा त्यांचा जन्म झाला तेव्हा त्यांच्या आतड्यात ब्लॉकेज असल्याचे आढळून आले, त्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. नंतर त्याच्या आई-वडिलांना समजले की, या औषधांमुळे आपल्या मुलाच्या मूत्रपिंडावर परिणाम झाला होता, त्यानंतर त्याच्या पालकांनी कसा तरी त्याच्यावर उपचार केले. सध्या चंद्रप्रकाश यूपीएससीची तयारी करत आहे. चंद्र प्रकाश याच्या म्हणण्यानुसार, तो अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेत आहे आणि त्यासोबतच तो केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) तयारीही करत आहे. चंद्र प्रकाश इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी (IGNOU) मधून आपले शिक्षण घेत आहेत, कारण तो आपला उरलेला वेळ UPSC च्या तयारीसाठी घरीच घालवतो.