Sikandar : 2023 मध्ये अभिनेता सलमान खानचे दोन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले होते. 'किसी का भाई किसी की जान' आणि 'Tiger 3' या दोन्ही चित्रपटांमधील सलमान खानची स्टाईल प्रेक्षकांना खूप आवडली होती. आता तो 'सिकंदर'च्या भूमिकेत दिसण्यासाठी सज्ज झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

' सिकंदर ' चित्रपटाच्या प्रत्येक अपडेटवर चाहते बारीक नजर ठेवून आहेत. ए.आर. मुरुगदास यांच्या दिग्दर्शनाखाली हा चित्रपट तयार होत आहे. या चित्रपटाच्या स्टार कास्टकडून आतापर्यंत समोर आलेल्या सर्व नावांसह सलमान खान पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटात आता आणखी एका अभिनेत्याचे नाव जोडले गेले आहे. त्याचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हा अभिनेता सलमानच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.


'सिकंदर' चित्रपटात  '3 इडियट्स' अभिनेत्याची एन्ट्री


'3 इडियट्स' हा बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक आहे. आमिर खान , आर माधवन आणि शर्मन जोशी या तिघांनी लोकांना केवळ हसवलेच नाही, तर त्यांना धडा देऊन भावूकही केले आहे. अशातच आता या तिघांपैकी एकाची सलमान खानच्या  'सिकंदर' चित्रपटात एन्ट्री निश्चित झाली आहे. या अभिनेत्याने याआधी सलमान खानसोबत कधीही काम केले नाही. 



रिपोर्टनुसार, सलमान खानच्या 'सिकंदर' या चित्रपटात अभिनेता शर्मन जोशी याने एन्ट्री केली आहे. सेटवरील त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.  ज्यामुळे तो या चित्रपटाचा भाग असल्याची पुष्टी झाली आहे. 


'सिकंदर'मध्ये शर्मन जोशी ही भूमिका साकारणार 


'सिकंदर' या चित्रपटात शर्मन जोशी एका दमदार भूमिकेत दिसणार आहे. रिपोर्टनुसार, चित्रपटात सलमान आणि शर्मन मित्र म्हणून दाखवले जाणार आहेत. सलमान खानच्या या प्रवासात त्याची महत्त्वाची भूमिका असणार आहे. जी चित्रपटात सुंदर दाखवण्यात येणार आहे. शर्मन जोशीनेही या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. 'सिकंदर' हा सलमान आणि शर्मन यांच्यातील पहिला चित्रपट असणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग ज्या सेटवर सुरु आहे. त्या सेटची किंमत 15 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. हा चित्रपट 2025 च्या ईदला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.