झी मराठीच्या `३६ गुणी जोडी` मालिकेसाठी ३६ influencer आले एकत्र
ही मालिका२३ जानेवारीपासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी ६.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येतेय.
मुंबई : झी मराठीवर येऊ घातलेली नवी मालिका '३६ गुणी जोडी' या नव्या मालिकेच्या कलाकारांसोबत या 36 influencer नी एकापेक्षा एक भन्नाट रिल्स बनवले असून, सोशल मीडियावर या 36 reels ची चर्चा सध्या पाहायला मिळतेय.
ही मालिका२३ जानेवारीपासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी ६.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. वेदांत आणि अमुल्या हे अगदीच एकमेकांपासून वेगळया असणाऱ्या दोन व्यक्तींची कथा आहे.... वेगळे विचार वेगळया सवयी वेगळी मते जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय धमाल होते याची ही गोष्ट आहे. वेदांतची भूमिका अभिनेता आयुष संजीव तर अमुल्या ही भूमिका अभिनेत्री अनुष्का सरकटे साकारते आहे.
झी मराठीने या मालिकेच्या प्रमोशनसाठी या मालिकेचं शीर्षकाचा छान वापर करुन 36 influencer ना एकत्र आणण्याचं काम केलं आहे. ही दोन युवा व्यक्तींच्या परस्पर विरोधी विचारांची गोष्ट असल्याने युवा पिढीला ही गोष्ट नक्की आवडेल... सध्या युवकांमध्ये असणारं reelsचं क्रेझ लक्षात घेता ही भन्नाट कल्पना झी मराठीने आपल्या सोशल मीडियावर राबवलेली दिसून येतेय. ज्याला झी मराठीच्या प्रेक्षकांकडून भन्नाट प्रतिसाद मिळताना दिसतोय.
छोटे आणि सोपे असे हे Instagram reels सध्या चांगलेच चर्चेत आहेत.... 36 influencer आपल्या वेगवेगळया शैलीत अमूल्या आणि वेदांतचं नातं प्रेक्षकांसमोर मांडताना दिसत आहेत. एकूणच या मालिकेला घेऊन प्रेक्षकांमध्ये कमालीचा उत्साह सोशल मीडियावर पहायला मिळत आहे..