नवी दिल्ली : बॉलिवूडच्या इतिहासात 'शोले' या सिनेमाची एक वेगळीच जागा आहे. आणि आजही या सिनेमाचं नाव घेताच लोकांना 'बसंती' आणि 'गब्बर' सारखे कॅरेक्टर आठवतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा सिनेमा आजच्याच दिवशी १९७५ साली प्रदर्शित झाला होता. या सिनेमाच्या कथेपासून ते अगदी प्रत्येक पात्र साकारणाऱ्या कलाकारांपर्यंत  साऱ्यांनीच या सिनेमाच प्राण ओतला. या सिनेमाने अनेक लोकांचं मनोरंजन केलं. त्याचप्रमाणे सिनेमाचं संगीत देखील अतिशय सुंदर होतं. जे आजही लोकं गुणगुणतात. 


या सिनेमाची गोष्ट सलीम जावेद यांनी लिहिली आहे. आणि रमेश शिप्पी यांनी याचं दिग्दर्शन केलं आहे. सिनेमात असे असंख्य डायलॉग आहेत जे आजही लोकांना तोंडपाठ आहेत. असं सांगितलं जातं की, या सिनेमात खलनायकाच्या भूमिकेसाठी अनेकांनी नकार दिला. आणि त्यानंतर गब्बर सिंहचं कॅरेक्टर हे अमजत खान यांनी साकारलं. तसेच अमिताभ यांनी साकारलेल्या भूमिकेसाठी देखील अनेकांनी विरोध दर्शवला शेवटी महानायक अमिताभ बच्चन जय बनले.


जाणून घेऊया 'शोले'तील काही खास डायलॉग 


१) 'हम सिर्फ पैसों के लिए काम करते हैं' 


२) 'बुढ़िया गोइंग जेल एंड चक्की पीसिंग एंड पीसिंग एंड पीसिंग'


३) 'बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना'.


४) 'अब तेरा क्या होगा कालिया'.


५) जो डर गया समझो मर गया'. 


६) 'ये हाथ मुझे दे दे ठाकूर'.


७) 'चल धन्नों आज तेरी बसंती की इज्जत का सवाल है'.


८) 'हमारा नाम भी सूरमा भोपाली ऐसे ही नहीं है'.


९) 'ये हाथ नहीं फांसी का फंदा है'.