मुंबई : बॉलिवूड अभिनेता विक्की कौशलचा 'उरी' सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून अगदी पहिल्या दिवसांपासून चर्चेत आहे.  या सिनेमामुळे विक्की कौशलच सगळीकडून कौतुक होत आहे. तसेच हा सिनेमा किर्तीसोबतच पैसा कमावण्यात देखील यशस्वी ठरला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जम्मू काश्मीरच्या उरीत 2016 साली आर्मी कॅम्पमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात संपूर्ण देशाला हादरा बसला. या हल्याचा बदला घेण्यासाठी 'सर्जिकल स्ट्राइक' करण्यात आलं. ज्यामध्ये आपल्या जवानांना यश मिळालं. 




या सर्जिकल स्ट्राइकची संपूर्ण गोष्ट पडद्यावर 'उरी : द सर्जिकल स्ट्राइक' या सिनेमातून मांडली आहे. खऱ्या घटनेवर आधारित हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीला पडला आहे. या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या 8.25 करोड रुपये आणि दुसऱ्या दिवशी 12.25 करोड रुपये, तिसऱ्या दिवशी 14.50 करोड रुपयांची कमाई केली आहे.  सोमवारी चौथ्या दिवशी  9.95 करोड रुपयांची कमाई केली आहे. यानुसार सिनेमाने आतापर्यंत 45 करोड रुपयांची कमाई केली आहे. 




आदित्य धर दिग्दर्शित 'उरी'  या सिनेमात विक्की कौशलसोबतच मोहित रैना, यामी गौतम, परेश रावल, कृति कुल्हारी, स्वरूप संपत आणि रजित कपूर यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत.