मुंबई : इंडस्ट्रीत असे काही स्टार किड्स आहेत जे सोशल मीडियावर राज्य करतात आणि करीना कपूर आणि सैफ अली खान यांचा लाडका तैमूर या यादीत अव्वल आहे. तैमूर शाळेसाठी किंवा खेळण्यासाठी घरातून निघाला तरी तो नेहमीच चर्चेत असतो. आता 5 वर्षांच्या चिमुकल्या तैमूरने असं काम केलं आहे की, आई -वडिलांच्या आनंदाचा पारा उंचावला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तैमूरला मिळाला ताइक्वांडो येलो बेल्ट
तैमूर अजून ६ वर्षांचा झाला नसेल. पण आतापासून तो बऱ्याच गोष्टींमध्ये व्यस्त आहे. कधी तो पेंटिंग करतो तर कधी बेकिंग करतो. याचबरोबर तैमूरने हे सिद्ध केलं आहे. की, तो तायक्वांदोमध्ये कोणापेक्षा कमी नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तैमूरला अलीकडेच तायक्वांदोमध्ये यलो बेल्ट मिळाला आहे. त्यामुळे खास प्रसंगी सैफ आणि करीना दोघंही तैमूरसोबत ट्रेनिंग सेंटरमध्ये पोहोचले. यावेळी तैमूर तायक्वांदोच्या ड्रेसमध्ये दिसला. तैमूरसोबतच करीनानेही यावेळी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


करीनाचा गॉर्जियस लूक
यादरम्यान करीना कपूर फिकट निळ्या रंगाची जीन्स आणि गडद निळ्या रंगाच्या शर्टमध्ये दिसली. तिने काळा चष्मा आणि स्टायलिश बेलीने तिचा लूक पूर्ण केला. आणि ती खूप सुंदर दिसत होती. तिचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. त्याचबरोबर सैफ अली खान देखील करिनासोबत स्टायलिश स्टाईलमध्ये दिसला होता. मात्र यावेळी जेह कुठेही दिसला नाही.