Mohan Death : तामिळ चित्रपटांमध्ये सहायक भूमिकेसाठी कॉमेडी करणाऱ्या अभिनेता मोहन यांचे निधन झाले आहे. त्यांचे निधन 31 जुलै रोजी झाले. मोहन यांनी त्यांच्या कॉमेडी भूमिकांसाठी ओळखायचे. त्यांनी 80 ते 90 च्या दशकातील अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं होते. मात्र, त्यांचे निधन ज्या प्रकारे झाले त्यानं अनेकांना मोठा धक्का बसला आहे. त्याचं कारण म्हणजे मोहन याचं शव मदुराईच्या रस्त्यांवर सापडलं. मोहन यांच्या निधनानं प्रेक्षकांपासून चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोहन हे त्यांच्या 60 थीत होते. दरम्यान, गेल्या बऱ्याच काळापासून ते कामाच्या शोधात होते. तरी त्यांना काम मिळत नव्हतं असे रिपोर्ट्समध्ये म्हटले जात आहे. 10 वर्षांपूर्वीच त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. तेव्हा पासून ते भीक मागून त्यांचे दिवस काढत होते असं एका रिपोर्टनुसार म्हटलं जातं. मोहन हे सलेम जिह्ल्यातील मेट्टूरची राहणारी आहे. रिपोर्टनुसार, आज सकाळी पेरिया रश वीथिवर त्यांचे शव सापडले. रिपोर्ट्सनुसार, पोलिसांनी मोहन यांचे शव पोस्टमार्टम करण्यासाठी मदुरै सरकारी रुग्णालयाती पाठवलं आहे. पोस्टमार्टमनंतर मोहन यांचे शव त्यांच्या गावी सलेम येथे पाठवण्यात येतील. त्यांना दोन भाऊ आणि पाच बहिणी आहेत. 



हेही वाचा : 'ये तो मेरे दाएं हाथ का खेल...', किसिंग सीनवर फिरकी घेणाऱ्या रणवीरला धरम पाजीचे उत्तर!


मोहन यांची सगळ्यात लोकप्रिय भूमिका ही 1989 साली प्रदर्शित झालेल्या अपूर्व सगोधरार्गलमध्ये होते. चित्रपटात त्यांनी कमल हासन यांच्या मित्र अप्पूची भूमिका साकारली होती. 2009 मध्ये मोहन यांनी आणखी एका दर्जेदार अशा चित्रपटात काम केले होते. बाला की नान कदवुल मध्ये देखील त्यांनी चांगला अभिनय केला होता. ज्यात आर्यानं पूजा यांनी देखील महत्त्वाची भूमिका साकारली होती. त्या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर त्यांना काम मिळालं नाही आणि त्यानंतर ते रस्त्यावर भिक माग लागले. तिथल्या स्थानिक लोकांनी त्यांचं शव पाहिल्यानंतर पोलिसांना कळवलं. त्यांना पाहून कोणीही ओळखू शकणार नाही अशी त्यांची परिस्थिती होती असं म्हटलं जातं आहे. त्यांचं शवविच्छेदन केल्यानंतर त्यातून माहिती समोर आली आहे की त्यांचे नैसर्गिक कारणामुळे निधन झाले. कारण ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होती.