मोठी बातमी : अनन्या पांडेच्या अडचणी वाढणार?, `या` 7 गोष्टींच्या फॉरेन्सिक टेस्टनंतर उलगडणार सत्य?
अनन्या पांडेच्या `या` 7 गोष्टींच्या फॉरेन्सिक टेस्टमुळे केसला मिळणार नवं वळण?
मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या अटकेनंतर अभिनेत्री अनन्या पांडे वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. आर्यन-अनन्याचं चॅट समोर आल्यानंतर अनन्या एनसीबीच्या रडारवर आहे. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनन्या पांडेचे 7 इलेक्ट्रॉनिक गॅझेट फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली आहेत. यामध्ये मोबाईल आणि लॅपटॉपचाही समावेश आहे. या फॉरेन्सिक तपासणीद्वारे, एनसीबीला चॅट्स आणि इतर तपशील जाणून घ्यायचे आहेत, जे चॅट कदाचित हटवले गेले असतील. त्यामुळे या तपासणीनंतर मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे.
आर्यनच्या अटकेनंतर अभिनेता चंकी पांडेची मुलगी आणि अभिनेत्री आनन्या पांडेच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. सलग दोन दिवस एनसीबीकडून तिची चौकशी करण्यात आली. सोमवारी देखील आनन्याला पुन्हा चौकशीसाठी बोलावलं आहे. आता अनन्यानंतर आणखी स्टारकिड याप्रकरणी समोर येतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, शुक्रवारी अनन्याला चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात पोहोचण्यासाठी उशिर झाला त्यामुळे मली पदार्थ नियामक विभागाचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी चौकशी सुरू करण्यापूर्वी अनन्याला फटकारले.अनन्याला सकाळी 11 वाजता एनसीबी कार्यालयात हजर राहण्यास सांगितलं होतं. पण ती 11 वाजता नाही तर दुपारी 2 वाजता एनसीबी कार्यालयात पोहोचली.
समीर वानखेडे, अनन्याला म्हणाले, 'तुला 11 वाजता बोलावलं होतं. तू आता येत आहेस. आधिकारी याठिकाणी तुझ्या प्रतीक्षेत नाही बसलेत. हे तुझे प्रॉडक्शन हाऊस नाही. याठिकाणी जेव्हा बोलावलं जाईल तेव्हा यावं लागेल...' अशा कठोर शब्दांत वानखेडे यांनी अनन्याला बजावलं. आता सोमवारी कोणत्या गोष्टींचा खुलासा होणार हे पाहाणं महत्त्वाचं ठकणार आहे.