70 Year Old Supermodel Beverly Johnson : ग्लॅमर इंडस्ट्री म्हटलं की प्रत्येक व्यक्तीला आठवतात त्या तरुन मुली... या इंडस्ट्रीत येण्यासाठी अनेक मुली प्रयत्न करतात. मात्र, असे म्हटले जात आहे की कोणत्याही मॉडेलचा एक काळ असतो. थोड्या काळासाठी मॉडेल येतात आणि नंतर त्या नाहीशा होतात. मात्र, या सगळ्याला हॉलिवूड सुपरमॉडल बवर्ली जॉनसननं मागे टाकलं आहे. बवर्लीनं कधीच मॉडेलिंग करण्याचा विचार केला नव्हता. बवर्लीनं लॉमध्ये शिक्षण पूर्ण केलं. मात्र, तिच्या नशीबात काही वेगळंच लिहिलं होतं.  (Beverly Johnson)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बवर्लीनं 70 च्या दशकात मॉडेलिंग करण्यास सुरुवात केली. 70 च्या दशकात तर इंडस्ट्रीत फक्त गोऱ्या रंगाच्या आणि त्यासोबत निळे डोळे असणाऱ्या मॉडेलला पसंती दिली जात होती. त्यामुळे अशा काळात एका कृष्णवर्षीय मुलीन मॉडेलींगच्या क्षेत्रात पदार्पण करणं खूप कठीण होतं. बवर्लीच्या प्रवासाची सुरुवात खूप कठीण होती पण तिनं कसं तरी आपले स्थान निर्माण केले. सुरुवातीला अनेक फॅशन डिझायर्न्सनं तिला रिजेक्ट केले आणि सांगितले की तू स्वत: ला काय समजतेस? मात्र, बवर्लीवर या सगळ्याचा परिणाम झाला नाही. कोणी काहीही बोलत असलं तरी तिनं कोणाकडे लक्ष दिलं नाही. 


हेही वाचा : Fact Check : शाहरुखचा लेक Aryan Khan करतोय 'या' पाकिस्तानी अभिनेत्रीला डेट?



बवर्लीनं तिला मिळालेल्या या वेळेचा योग्य वापर केला आणि मॉडिलिंग इंडस्ट्रीत स्वत: ची फक्त ओळख मिळवली नाही तर इंडस्ट्रीत मोठे नाव कमावले. यासाठी बवर्लीनं तिची नेटवर्क एजन्सी, तिची टीम बदलली आणि अशा प्रकारे बवर्लीनं यशाचं शिखर गाठलं. आज बवर्ली ही 70 वर्षांची आहे. तरी तिच्या ग्लॅमर आणि कर्वी फिगरसाठी ती ओळखली जाते. 



वयाच्या 70 व्या वर्षी बवर्लीची स्किन इतकी टाईट असण्यामागे स्किन ट्रीटमेंट आहे. तिनं सर्जरी करत तिची स्किन टाईट केली आहे. बवर्ली ही एक प्रसिद्ध मॉडेलसोबतच अभिनेत्री, गायिका आणि बिझनेस महिला आहे. 1974 मध्ये, अमेरिकन मॅग्झिज व्होगच्या मुखपृष्ठावर दिसणारी ती पहिली आफ्रिकन-अमेरिकन मॉडेल ठरली होती. शिवाय 1974 साली फ्रेंच एले मॅग्झिनच्या कव्हर पेजवर दिसणारी ती पहिली कृष्णवर्णीय महिला होती. बवर्लीला अनंसा नावाची एक मुलगी असून तिचे लग्न झाले आहे. तिच्या मुलीला एक मुलगी आणि तीन मुलं आहेत.