Veteran Bollywood Actress Tanuja Hospitalised: ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांना जुहू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी संध्याकाळी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तनुजा यांच्यावर सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली ICU मध्ये उपचार सुरू आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

PTIने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, वयाशी संबंधित आजारांमुळं तनुजा यांना तातडीने जुहूयेथील रुग्णालयात दाखल करावे लागले. 80 वर्षीय तनुजा यांच्यावर सध्या ICUमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येतेय. आता तनुजा यांना अंडर ऑब्जरव्हेशन ठेवण्यात आले असून आधीपेक्षा त्यांच्या प्रकृतीत सुधार असल्याचे सांगण्यात येतेय. 


दरम्यान, तनुजा यांना रुग्णालयात दाखल केल्यापासून आत्तापर्यंत काजोल आणि तनीषा मुखर्जीसोबतच जावई अजय देवगण यांच्याकडूनही तनुजा यांच्या प्रकृतीबाबत कोणतेही ऑफिशिअल स्टेटमेंट देण्यात आलेले नाहीये.  तनुजा यांच्या तब्येतीबाबत कळताच चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधार यावा आणि त्या ठणठणीत बऱ्या व्हाव्या यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. 


तुनजा यांच्या सिनेकारकीर्दीबद्दल सांगायचे झाल्यास, 23 सप्टेंबर 1943 साली त्यांचा जन्म झाला. वयाच्या 16 व्या वर्षीच त्यांनी पहिल्यांदा चित्रपटात काम केले. त्यांचा पहिला चित्रपट छबिला हा होता. 1950 मध्ये त्यांनी हमारी बेटी चित्रपटात त्यांची मोठी बहिण नुतनसोबत चित्रपटात काम केले होते. त्यानंतर 1961 मध्ये हमारी याद आएगी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती. त्यानंतर एकापेक्षा एक हिट चित्रपट त्यांनी बॉलिवूडला दिले. ज्वेल थीफ, बहारे फिर भी आएंगी, पैसा या प्यार, हाथी मेरे साथी, मेरे जीवन साथी, असे अनेक ब्लॉकब्लास्टर सिनेमे त्यांनी दिली. 


हिंदीबरोबरच काही बंगाली चित्रपटातही त्यांनी भूमिका साकारल्या Deya Neya (1963), Anthony-Firingee (1967, Teen Bhuvaner Parey (1969 आणि राजकुमारी (1970) या सारखे काही त्यांचे बंगाली सिनेमे गाजले आहेत. तनुजा यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास, त्यांना दोन मुली आहेत. काजोल आणि तनीषा मुखर्जी. मोठी मुलगी काजोल बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे. 90 च्या दशकात तिचे अनेक सिनेमा बॉलिवूडमध्ये गाजले. तर, तनीषा मुखर्जी हिला मात्र बॉलिवूडमध्ये फारसे यश मिळाले नाही. सध्या तिने एका रिअॅलिटी कार्यक्रमात भाग घेतला आहे.