मुंबई : सलमान खानसोबत सुपरहिट चित्रपट देऊन या अभिनेत्री बॉलिवूडमधून गायब झाल्या. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सुपरस्टार सलमान खानसोबत काम करण्यास नकार देणारा कोणीही अभिनेता आणि अभिनेत्री क्वचितच असेल. आज आम्ही तुम्हाला या विशेष अहवालात सलमान खानसोबत सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर बॉलिवूड इंडस्ट्री सोडून गेलेल्या अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत. तुम्हीही ही यादी पाहून व्हाल थक्क.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असीन 
बॉलिवूड अभिनेत्री असिन पहिल्यांदा सलमान खानसोबत तिच्या 'लंडन ड्रीम्स' या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात अजय देवगण देखील मुख्य भूमिकेत होता. यानंतर असिन आणि सलमान खानची जोडी 'रेडी' चित्रपटात दिसली.



आयिशा टाकिया
आयशा टाकिया आणि सलमान खानची जोडी 'वॉन्टेड' चित्रपटात दिसली होती. यानंतर ही जोडी कधीच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसली नाही.



भाग्यश्री
भाग्यश्रीने सलमान खानच्या 'मैने प्यार किया' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील दोघांची जोडी प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती.



भूमिका चावला
भूमिका चावला आणि सलमान खानचा सुपरहिट चित्रपट 'तेरे नाम' कोणीही कसं विसरू शकेल. या चित्रपटाच्या यशानंतर ही जोडी कधीच एकत्र दिसली नाही.



डेझी शहा
डेझी शाह सलमान खानसोबत 'जय हो' चित्रपटात दिसली. या चित्रपटानंतर ती सलमान खानसोबत 'रेस 3' मध्ये शेवटची दिसली होती.



स्नेहा उल्लाल
स्नेहा उल्लालने सलमान खानच्या 'लकी: नो टाइम फॉर लव'सह इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं. यानंतर सलमान आणि स्नेहा एकत्र दिसले नाहीत.



सोमी अली
बॉलिवूड अभिनेत्री सोमी अली आणि सलमान खान यांचं बऱ्याच काळापासून अफेअर होतं. एका मुलाखतीदरम्यान सोमी अलीने सांगितले होतं की, सलमान खानने तिला फसवलं आहे. सोमी अलीने अनेक चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर बॉलिवूड विश्वातून ब्रेक घेतला.



झरीन खान
बॉलिवूड अभिनेत्री जरीन खानने सलमान खानच्या 'वीर' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटानंतर ती सलमान खानसोबत कधीच दिसली नाही.



चांदनी
सलमान खान आणि चांदनी 'सनम बेवफा' चित्रपटात दिसले होते. त्यांची जोडी या चित्रपटात चांगलीच आवडली होती.मात्र या सिनेमानंतर कधीचं हे दोघं एकत्र दिसले नाही.