PHOTO : लता मंगेशकर यांनी दिली होती सोन्याची चेन; पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता केलं दुसरं लग्न

Entertainment : या फोटोमधील दिसणारा व्यक्ती हा संगीत विश्वातील मोठं नाव आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज व्यक्तिमत्व आहे. 90 च्या दशकापासून सुरेल आवाजाची जादू आजही शेकडो सुपरहिट गाणी गायली आहेत. 

| Nov 30, 2024, 21:53 PM IST
1/7

चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते उदित नारायण यांच्याबद्दल बोलत आहोत. 1 डिसेंबर 1955 ला उदित नारायण यांचा बिहारच्या सुपौल जिल्ह्यात जन्म झाला. उदित नारायणने हिंदीशिवाय तामिळ, मल्याळम, कन्नड, भोजपुरी आणि बंगाली भाषांमध्येही गाणी गायली आहेत. 

2/7

उदित नारायण यांचं पूर्ण नाव उदित नारायण झा आहे. त्यांचा संबंध नेपाळशी जोडला गेला आहे. कारण त्यांनी फिल्मी करिअरची सुरुवात हिंदी नाही तर नेपाळी चित्रपटातून केली होती. त्या चित्रपटाचं नाव सिंदूर होतं. 

3/7

तब्बल 10 वर्षांच्या संघर्षांनतर उदित नारायण यांना पहिलं सुपरहिट गाणं मिळालं ते म्हणजे कयामत से कयामत तक मधील पापा कहते हैं बडा नाम करेगा. यानंतर त्यांना अनेक ऑफर्स मिळाल्यात. 

4/7

आजही अनेकांना माहिती नाही, पण उदित नारायण यांनी दोन लग्न केलीय. त्यांनी ही गोष्ट अनेक वर्षे लपवून ठेवली होती. 2006 मध्ये रंजना नारायण यांनी उदित नारायण यांची पत्नी असल्याचा दावा केला होता. मात्र उदित यांनी त्यांना ओळख दिली नाही. 

5/7

त्यानंतर रंजनाने कोर्टात धाव घेतली आणि फोटो आणि कागदपत्रे दाखवल्यानंतर उदितने लग्नाला होकार दिला. यानंतर न्यायालयाने त्यांना दोन्ही पत्नींना सोबत ठेवण्याचे आदेश दिले. 

6/7

विवाहित असूनही उदित नारायण यांनी दीपा नारायणसोबत 1985 मध्ये लग्न केलं. दीपापासून त्यांना आदित्य नारायण हा मुलगा झाला. आम्ही तुम्हाला सांगतो की आदित्य देखील त्याच्या वडिलांप्रमाणे पार्श्वगायक आहे. वडिलांच्या वाढदिवशी तो श्वेता अग्रवालसोबत लग्न करणार आहे.

7/7

1992 मध्ये बंगळुरूच्या एका स्टेडियममध्ये एक शो झाला होता. त्या दिवशी 1 डिसेंबरला उदित नारायण यांचा वाढदिवस होता. त्यांनी सांगितलं की, 'तिथे मदन मोहन साहेबांचा मुलगा संजीव कोहली यांनी लताजींच्या कानात सांगितलं आज उदितचा वाढदिवस आहे. तिथे सुमारे दोन ते तीन लाख लोक उपस्थित होते. त्या सर्वांच्या समोर लतादीदींनी सोन्याची चेन भेट दिली आणि तिथल्या अँकरला सांगितलेृं की आज जाहीर करा की उदित नारायण पार्श्वगायनाचा राजकुमार आहे. ही पदवी मला लताजींनी दिली आहे.'