मुंबई : मल्याळम दिग्दर्शक अली अकबर यांनी पत्नीसह इस्लाम धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत यांच्या निधनानंतर काही इस्लामवाद्यांकडून आनंद साजरा करण्यात आला. याच्या निषेधार्थ अली अकबर यांनी इस्लाम धर्माचा त्याग केला. तामिळनाडूच्या कुन्नूर जिल्ह्यात बुधवारी झालेल्या अपघातात जनरल बिपिन रावत यांच्यासह 13 जणांचा मृत्यू झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अकबर म्हणाले की, इस्लामच्या सर्वोच्च नेत्यांनीही अशा 'देशद्रोही' लोकांना विरोध केला नाही. ज्यांनी शूर लष्करी अधिकाऱ्यांचा अपमान केला. मी हे स्वीकारू शकत नाही. माझा धर्मावरील विश्वास उडाला आहे. यासंदर्भातील एक व्हिडीओही त्यांनी बुधवारी फेसबुकवर शेअर केला.


ते पुढे म्हणाले, 'आजपासून मी मुस्लीम नाही, भारतीय आहे. माझे हे उत्तर त्या लोकांसाठी आहे ज्यांनी भारताविरोधात हजारो हसतमुख इमोटिकॉन पोस्ट केले आहेत.'' अकबर यांच्या पोस्टनंतर अनेक मुस्लिम युजर्सनी त्याच्या पोस्टला विरोध केला. 


मात्र, अनेक युजर्सनेही त्यांना पाठिंबा दिला. ही पोस्ट आता फेसबूकवरून हटवण्यात आलं आहे. अकबर यांनी सांगितले की, ते आणि त्यांची पत्नी हिंदू धर्म स्वीकारतील आणि अधिकृत रेकॉर्डमध्ये धार्मिक माहिती बदण्याची प्रक्रिया सुरू करतील. आपल्या दोन्ही मुलींना धर्मांतर करण्यास भाग पाडणार नाही, असं देखील त्यांनी सांगितले.