कपाळावर कसली खुण आहे? `तो` फोटो शेअर करत ऐश्वर्या नारकर एका शब्दात म्हणाल्या...
Aishawarya Narkar: ऐश्वर्या नारकर या मराठीतल्या लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांच्या अभिनायची जेवढी चर्चा होते तेवढीच त्यांच्या सौंदर्याची, त्यांच्या फॅशनसेन्सचीही सोशल मीडियावर चर्चा होताना दिसते. सध्या त्यांना त्यांच्या एका फॅन्स प्रश्न विचारला आहे ज्याची सोशल मीडियावर चर्चा आहे.
Aishwarya Narkar Spot: ऐश्वर्या नारकर या 50 वर्षांच्या आहेत. बट एज इज जस्ट अ नंबर... या वयातही ऐश्वर्या नारकर या प्रचंड एव्हरग्रीन आणि सुंदर दिसतात. त्या सोशल मीडियावरही चांगलेच सक्रिय असतात. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा ही रंगलेली असते. त्या आपल्या सोशल मीडियावर आपले सुंदर आणि हटके फोटो हे शेअर करताना दिसतात. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. यावेळी त्यांनी आपल्या इन्टाग्राम अकांऊटवरून एक Q and A सेशन ठेवले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या चाहत्यांना Ask Me Anything चा प्रश्न विचारला होता. तेव्हा त्यांच्या चाहत्यांनी त्यांना अनेक प्रश्न विचारले होते. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली होती. यावेळी एका चाहत्यानं विचारलेल्या प्रश्नाची चांगलीच चर्चा रंगलेली होती. हा चाहता त्यांचा फार मोठा फॅन आहे हेच त्याच्या प्रश्नावरून दिसते आहे. तेव्हा चला तर मग पाहुया की त्यानं असा काय प्रश्न विचारला आणि त्यावर ऐश्वर्या नारकर यांनी नेमकं काय उत्तर दिलं आहे.
मालिका, चित्रपटांतून अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या चांगल्या लोकप्रिय आहेत. काही वर्षांपुर्वी आलेली त्यांची 'स्वामिनी' ही मालिका बरीच गाजली होती. ही मालिका वीरपराक्रमी आणि धुरंधर पेशव्यांच्या घराण्यावर आधारित होती. त्यामुळे या मालिकेची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. या मालिकेतून त्या गोपिकाबाई पेशवेंच्या भुमिकेतून प्रेक्षकांसमोर आल्या होत्या. त्यांचा रूबाब आणि करारीपणा पाहून सर्वचजण त्यांच्या अभिनयावर फिदा झाले होते. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा होती. त्यानंतर आता त्या 'ताली' या वेबसिरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. या वेबसिरिजला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. ही सिरिज गौरी सावंत यांच्या जीवनावर आधारित आहे. रवी जाधव यांनी ही वेबसिरिज डिरेक्टर केली आहे.
हेही वाचा : ''विकृत पोंक्षे, टुकार अभिनेता...''; अभिनेत्याच्या 'त्या' वादग्रस्त विधानावर कॉंग्रेसची तिखट प्रतिक्रिया
या Ask Me Anything च्या सेशनमध्ये ऐश्वर्या नारकर यांनी अनेकांनी प्रश्न विचारले. आपल्या कपाळावर खुणेबद्दल त्यांनी खुलासा केला आहे. त्यांना एक चाहत्यानं विचारले की, ''मॅम तुम्हाला ती कपाळावरची खूण खूप छान दिसते. सॉरी पण ते काय झालं आहे?” त्यावर त्यांनी उत्तर दिले आहे की, ''ही जन्म खूण आहे.'' #birthmark असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
फिटनेस फंडा, नाटकामध्ये पुन्हा कधी काम करणार, त्यांचं शिक्षण, त्यांचं वय, त्यांचं खरं नावं अशा विविध गोष्टींवर त्यांनी चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर दिले आहे.