मुंबई : अभिनेत्री करीना कपूर खान राहत असलेल्या इमारतीच्या समोरील इमारतीस भीषण आग लागली आहे. त्यामुळे परिसरात एकचं खळबळ माजली आहे.  इमारतीला आग लगल्याची माहिती मिळताचं पोलिसांचं पथक आणि अग्निशमन दलाच्या गाड्या  घटनास्थळी पोहोचल्या आहेत. संबंधित घटनेचा व्हिडीओ  viral bhayani ने इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. 



घटनेचा व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी घटनेची माहिती दिली आहे. 'आम्ही इमारतीखाली करीना कपूरची प्रतीक्षा करत उभे होतो, तेवढ्यात समोरच्या इमारतीला आग लागल्याचं कळालं...' सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.