मुंबई : प्रिया प्रकाश वॉरियर या 18 वर्षांच्या मुलीने सध्या इंटरनेटवर सार्‍यांनाच वेड लावलं आहे. 'ओरू अदार लव' या मल्याळम चित्रपटातून प्रिया सिनेसृष्टीमध्ये पदार्पण करणार आहे. हा चित्रपट सध्या रीलिज झाला आहे. मात्र त्यापूर्वीच प्रिया प्रकाश प्रसिद्धीच्या झोकात आली आहे. काही दिवसांपूर्वी मॉलमधील प्रियाची एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे.  


नव्या क्लिपची चर्चा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हॅलेन्टाईन डेपूर्वीकाही  दिवस आधी प्रियाच्या अदांच्या एक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला होता. तिच्या अदांनी सोशल मीडियातील नेटकर्‍यांना वेड लागलं होतं. आता एका मॉलमध्ये प्रिया आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि फॅन्ससोबत बोलताना दिसत आहे. प्रियाच्या या व्हिडिओला तिच्या फॅनफेजवरून शेअर करण्यात आलं आहे.  


 



सोशल मीडियात व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर तिला अनेक चित्रपटाच्या ऑफर्स मिळाल्या आहेत. प्रियाचा जन्म केरळमधील त्रिशुरमध्ये झाला. सध्या प्रिया बी कॉमच्या पहिल्या वर्षाला आहे. पहिल्याच चित्रपटात प्रियाने एका विद्यार्थिनीची भूमिका साकारली आहे. प्रिया प्रकाशझोकात आल्यानंतर तिच्या इंस्टाग्रामवरील अकाऊंटमध्येही फॉलोवर्सची संख्या झपाट्याने वाढली आहे. व्हायरल गर्ल प्रिया वॉरियरनं नाकारल्या अनेक चित्रपटांच्या ऑफर, हे आहे कारण