Malaika Arora Video viral : अभिनेत्री मलायका अरोरा नेहमी तिच्या हॉट अदा आणि डान्समुळे चर्चेत असते. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे मुंबई विमानतळावर दिसले होते. त्यानंतर त्यांच्यामध्ये सर्व काही ठीक असल्याचं म्हटलं जात होतं. ते व्हॅकेशनसाठी जात होते. मात्र, सध्या सोशल मीडियावर दोघांचा एक व्हिडीओ खूपच व्हायरल होत आहे. त्यामुळे ब्रेकअपच्या चर्चांना देखील उधाण आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मलायका आणि अर्जुन कपूर यांचे ब्रेकअप झाल्याची चर्चा रंगली आहे. सध्या 
अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर एकाच इव्हेंटमध्ये नजर आले होते. त्यांचा व्हिडीओ देखील खूप व्हायरल झाला आहे. व्हिडीओ पाहून चाहते देखील हैराण झाले आहेत. 


व्हिडीओमध्ये काय? 


एका इव्हेंटमध्ये अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा दोघे आमनेसामने आले होते. मात्र, त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिले देखील नाही. सध्या दोघांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यामुळे मलायका-अर्जुन याचा ब्रेकअप झाल्याची चर्चा सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून मलायका आणि अर्जुनच्या ब्रेकअपच्या बातम्या देखील येत होत्या. आता एका कार्यक्रमात ते दोघे वेगवेगळे बसले होते. 


पाहा व्हिडीओ


अर्जुन कपूर आणि मलायकाचा हा व्हिडीओ एका पापाराझीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. जो सध्या खूपच व्हायरल होत असून चर्चेत देखील आला आहे. त्या व्हिडीओवर चाहते देखील भरभरून कमेंट्स करत आहेत. नेहमी अर्जुन कपूर आणि मलायका इव्हेंटमध्ये एकत्र दिसायचे आणि बसायचे देखील. मात्र, या इव्हेंटमध्ये ते वेगवेगळे बसले होते. दोघांनी एकमेकांकडे पाहिले देखील नाही. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

मलायकाने केलं अर्जुनकडे दुर्लक्ष


या कार्यक्रमात अभिनेता अर्जुन कपूर हा आपल्या चाहत्यासोबत सेल्फी घेताना दिसला. परंतु मलायकाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि ती तेथून निघून गेली. त्याचवेळी अर्जुन मलायकाच्या मागे गर्दीतून पुढे जाण्यास मदत करताना दिसला. मात्र, मलायकाने अर्जुनकडे मागे वळून देखील पाहिले नाही. सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.