चंद्रपूर : एका तरूणाने काम, आर्थिक मदत, इत्यादी गोष्टींची मागणी न करता आमदाराकडे चक्क गर्लफ्रेंडची मागणी केली आहे.गर्लफ्रेंड न मिळाल्याने निराश झालेल्या महाराष्ट्रातील एका तरुणाने स्थानिक आमदाराला पत्र लिहिले. पत्रात आपले दुःख व्यक्त करताना, तरूणाने आमदाराकडून गर्लफ्रेंड मिळवण्याची मागणीही केली आहे. आता आमदाराला मोठा प्रश्न पडला आहे की या युवकाची समस्या कशी दूर केली जावू शकते. मतदारसंघातील एका तरुणाने महाराष्ट्रातील चंद्रपूर येथील आमदार सुभाष धोटे यांना पत्र लिहून गर्लफ्रेंडची मागणी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आमदार सुभाष धोटे यांना मराठीत लिहिलेल्या पत्रात भूषण जमुवंत यांनी आपली व्यथा मांडली आणि नंतर धोटे यांच्याकडे मैत्रीण बनवण्यासाठी मदत मागितली आहे. ही विचित्र मागणी पाहून आमदाराही हैराण झाले, त्या तरुणाला कसे समजावून सांगावे हे त्यांना समजत नाही.


तरूणाने पत्रात लिहिले आहे की, 'संपूर्ण तहसील मुलींनी भरलेला आहे, पण तरीही मला कोणतीही गर्लफ्रेंड नाही. ही चिंतेची बाब आहे. यामुळे माझा आत्मविश्वास कमकुवत झाला आहे, मी राजुरा ते ग्रामीण भागातील गडचांदूर पर्यंत प्रवास करतो, एकही मुलगी माझ्या सोबत येत नाही...'


तरुणाने पुढे म्हटले आहे की, दारू विकणाऱ्या लोकांच्या मैत्रिणी आहेत... कुरूप दिसणाऱ्यांच्याही मैत्रिणी आहेत.. अशा मुलांना पाहून मला वाईट वाटतं.., माझी विनंती आहे की तुम्ही तुमच्या मतदारसंघातील मुलींना प्रोत्साहन द्यावे, जेणेकरून ते आमच्यासारख्या मुलांचा आदर करतील...'


यावर आमदार धोटे यांना अद्याप पत्र पोस्टाने आलेलं नाही. पण त्यांच्या हाती व्हाट्सऍपद्वाचे मेसेज पोहोचला आहे. युवकाच्या पत्रावर ते म्हणाले, 'भूषण जामुवंत कोण आहे. कुठे राहतो. या तरुणाच्या शोधात कार्यकर्तेआहेत आणि मी त्याला भेटताच त्याच्याशी बोलेल...' असं देखील आमदार म्हाणाले.