मुंबई : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘होम मिनिस्टर’ आणि आदेश बांदेकर हे समीकरण झाले आहे, तर आदेशभावोजी हे अल्पावधीतच प्रत्येक मराठी कुटुंबातील सदस्य बनले आहेत. या कार्यक्रमाने आदेश बांदेकर यांचे आयुष्यच बदलून टाकले आहे. केवळ १३ भागांसाठी सुरु झालेल्या होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी आदेश बांदेकर यांच्यावर देण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पैठणी हे प्रत्येक गृहिणीचं स्वप्न असतं. जर एखादी स्त्री पैठणीसाठी पैसे साठवते म्हणजे ती फक्त साडी नसून त्या तिच्या भावना आहेत. त्यामुळे ही पैठणी घराघरात पोहोचवायची होम मिनिस्टरच्या संपूर्ण टीमने निश्चित केलं आणि तेरा भागांसाठी सुरू झालेल्या ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाने आज सोळा वर्षांचा टप्पा पूर्ण केला. आता या लोकप्रिय कार्यक्रमाचा भारत दौरा सुरु आहे.



सध्या दिल्ली, इंदूर, अहमदाबाद येथील चित्रीकरणाच्या गमती सांगताना आदेश भावोजी म्हणाले, "ज्या ज्या राज्यांमध्ये जातोय तिथला पेहराव मला दिला जातो. अनेकदा वहिनींच्या आग्रहाखातर तो पेहराव करून चित्रीकरण करावे लागते. तिथल्या भाषा, संस्कृती आणि त्यात जपलेलं मराठीपण हे पाहताना ‘महाराष्ट्राबाहेरचा महाराष्ट्र’ पाहतोय अशी भावना येते."