मुंबई : 'आई कुठे काय करते' मालिका प्रेक्षकांच्या मनामनात पोहोचली आहे. मालिकेने कायमच प्रेक्षकांना दर्जेदार एपिसोड दिले. सध्या मालिकेत अभिषेक आणि अनघाच्या लग्नाची गडबड सुरू आहे. यामुळे देशमुख कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. अरूंधतीच्या मनात अभिषेक-अनघाच्या लग्नाची धास्ती होती. पण कोणतंही विघ्न न येता हा मंगळ सोहळा आनंदाने पार पडला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अरूंधतीने या लग्नात सगळ्या गोष्टी अगदी पारंपरिक पद्धतीने केल्या. पण आता अरूंधतीने म्हटल्याप्रमाणे यानंतरचा काळ तिच्यासाठी महत्वाचा आहे. 


अभिनय साकारताना कलाकारही ती भूमिका जगत असतात. अरूंधतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभूलकर ही अतिशय भावनाप्रधान अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर अनेकदा ती अरूंधतीची भावना मांडत असतं. अशीच भावना तिने आपल्या पोस्टमधून शेअर केली आहे. 



तिची ही पोस्ट पाहून अरुंधती देशमुखांचे घर सोडून बाहेर पडणार की मालिकेतून ब्रेक घेणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पोस्टमध्ये मधुराणी प्रभुलकरने एक सेटवरील एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये देशमुखांचे संपूर्ण कुटुंब एका फ्रेममध्ये दिसत आहे. यासोबत तिने आता निघायची वेळ झाली, असं म्हटलं आहे. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.


प्रेक्षकांच्या पोस्टवर प्रतिक्रिया 


मधुराणीच्या या पोस्टनंतर अनेकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत. आम्हाला तुझी फार आठवण येईल, असे एका नेटकऱ्याने पोस्ट खाली कमेंट केली आहे. तर एका नेटकऱ्याने अरुंधतीशिवाय घराला या “घरपण ” नाय हो!! असे म्हटले आहे. अरु तू जीव आहेस ग घराचा…नको जाऊ, अशी विनंतीही एक नेटकरी कमेंटच्या माध्यमातून करताना दिसत आहे. सध्या मधुराणी यांच्या या पोस्टची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. 


मालिकेत मोठं वळण 


आई कुठे काय करते, मालिकेत आता नवं वळण पाहायला मिळेल. अनघा घरात प्रवेश करतेय. कितीही नाही म्हटलं तरी संजना अनघाला कशी वागणूक देईल? गिरीश अनघाच्या लग्नानंतर शांत बसेल का? महत्वाचं म्हणजे अरूंधतीने आशुतोषची मैत्री स्वीकारली आहे. या मैत्रीचा पुढचा प्रवास कसा असेल? त्याहून महत्वाचं म्हणजे अरूंधतीने देशमुखांचं नाव सोडलं आता ती 'समृद्धी' बंगला सोडणार का?