Aai Kuthe Kai Karte : अरूंधतीने आप्पांचं म्हणणं ऐकलं, बदलला पेहराव
अरूंधती आता तिच्या स्वभावाप्रमाणेच बदलणार रूप, अनोख्या रुपात दिसणार आई
मुंबई : आई कुठे काय करते या मालिकेने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. आई म्हणजे अरूंधती आता तिच्या आयुष्यात नवी भरारी घेत आहे. एका बाजूला नवी नोकरी, दुसरीकडे रेकॉर्डिंगचा पहिला अनुभव या सगळ्यात म्युझिक स्कूलची पार्टनरशीप.... अरूंधतीसाठी हे सगळंच नवं आहे. पण तिचा साधेपणा हेच या यशाचं गमक आहे.
अरूंधती कात टाकत असताना तिच्या पेहराव्यात देखील बदल व्हावा, अशी चर्चा घरी रंगते. आजी अनघाला नवीन नवरी म्हणून काही ड्रेस गिफ्ट करते. तर अरूंधतीला साडी.
यावरून चर्चा रंगतात. अरूंधती देखील ड्रेस किंवा कुर्ता जीन्स घालू शकते. असं अनघा, विशाखा आणि आप्पांना वाटतं.
पण आजी म्हणजे अरूंधती हिच्या सासूबाई कांचन यांना फार हे पटलेलं दिसत नाही. अरूंधतीने साडीतच राहावं असं त्या म्हणतात.
पण आता अरूंधतीने हा बदल स्वीकारला असं दिसत आहे. अरूंधती आपल्या जीन्स आणि टीशर्ट -जॅकेटमध्ये दिसत आहे.
हा फोटो अरूंधती साकारणाऱ्या मधुराणी गोखले प्रभूळकर या अभिनेत्रीने आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. हे अरूंधतीच्या बदलाचे संकेत तक नाही ना? अशी चर्चा रंगली आहे.
अरूंधती आता पहिल्या सारखी राहिली नाही. ती कोणतीही गोष्ट सहन करत नाही. जी गोष्ट पटत नाही त्यावर आपलं मत मांडते. मग ते घरी असो वा ऑफिसमध्ये. अरूंधतीमधील हा बदल कुटुंबातील काही व्यक्तींना आणि तिच्या प्रेक्षकांना आवडत आहे.