अरूंधतीला तुच्छ लेखणारा अनिरूद्ध जेव्हा खजिल होतो.....
कपाळ्यावर आठ्या आणून बोलणाऱ्या अनिरूद्धला लाजिरवाण्या प्रसंगाला सामोरं जावं लागलं
मुंबई : 'आई कुठे काय करते' या मालिकेतील अभिनेता मिलिंद गवळी म्हणजे अनिरूद्ध घराघरात पोहोचले आहेत. अरूंधतीवर कायम कुरघोडी करणारा अनिरूद्ध या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारत आहेत. अनिरूद्ध कायमच अरूंधतीचा आणि घरातील सगळ्यांचा अपमान करत असतो. पण या अनिरूद्धलाच जेव्हा एका लाजीरवाण्या प्रसंगाला आणि फजितीला सामोरं गेला आहे.
सोशल मीडियावर मिलिंद गवळी यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये मिलिंद गवळीला एका फजितीला सामोरं जावं लागलं. याचा किस्सा त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिला आहे.
मिलिंद गवळी यांची इंस्टाग्राम पोस्ट
पण ए सुट घालण्या मुळें माझी खूप गोची/ फजिती झाली आहे , एकदा जेजे हॉस्पिटल ला एका कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून डॉक्टर लहाने यांनी मला बोलवलं होतं , मी सूट घालून गेलो , कारण डॉक्टरांचा कार्यक्रम म्हटल्यानंतर सुटचं घालावा असं मला वाटलं, पण तिकडे गेल्यानंतर पाहतो तर सगळे डॉक्टर्स धोतर ,कुर्ता, फेटा घालून कार्यक्रमाला आले होते आणि एकटाच वेड्यासारखा कोट , सूटबूट घालून गेलो होतो. त्या दिवशी मला इतकं लाजल्यासारखं झालं, काही विचारू नका.
ब्रिटिश भारत सोडून गेले, पण जाताना सॉरी, थँक्यू आणि हे सुट मागे ठेवून गेले, आपल्या संस्कृतीला हे शोभत नाही, मला हे सगळं कळतं पण वळत नाही, तीन चार वेळेला मी माझेसगळे सुट्स मी देऊन टाकले आणि ठरवलं आता सूट घालायचा नाही भारतीय पोशाख करायचा,पण "आई कुठे काय करते " मध्ये अनिरुद्ध देशमुख ऑफिसला सूट घालतो, मग परत सूट घालायची दोन वर्षापासून सवय लागली. पण खरं सांगू का मला सूट घालायला छान वाटतं, एक दिवशी लंडन फिरायचं आह मला सुट घालून When you are in Rome behave like Romans, असं म्हणतात तसंच